Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Updated: शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 (09:56 IST)
 
प्रेम म्हणजे नक्की काय असतं?
प्रेम म्हणजे... भर उन्हात मिळालेली एखादी शीतल सावली. जेव्हा बाहेरच्या जगाचा खूप कंटाळा येतो, जेव्हा नशिबाचे वार झेलायची ताकद संपते, तेव्हा ज्या एका माणसाच्या मिठीत डोकं टेकवल्यावर "चला, सगळं काही ठीक होईल" असं वाटतं, ते म्हणजे प्रेम!
 
न सांगता कळणारं 'काहीतरी'
कधी कधी आपण तासन् तास गप्पा मारतो, पण तरीही बरंच काही सांगायचं राहून जातं. आणि कधी कधी फक्त एकमेकांच्या नजरेला नजर भिडली की समोरच्याच्या मनातली सगळी खळबळ कळते. समोरच्याचा आवाज ऐकून तो आज खुश आहे की काळजीत, हे जेव्हा तुम्हाला विनासायास उमजतं ना... तेव्हा प्रेमाला खऱ्या अर्थाने अंकुर फुटलेले असतात.

सोबतीचा आनंद
प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या यशात स्वतःचा आनंद शोधणं. जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं हसू बघून मनातून समाधान वाटतं, तेव्हा समजावं की तुम्ही प्रेमात आहात. हे असं नातं असतं जिथे 'मी' पणा संपतो आणि 'आम्ही' ची सुरुवात होते.
 
हक्काची भांडणं आणि तोच ओलावा
प्रेमात भांडणं नसतात असं नाही, उलट जिथे प्रेम असतं तिथेच हक्काचा राग असतो. पण भांडण झाल्यानंतर समोरचा माणूस गेल्यावर जो एक रिकामेपणा जाणवतो आणि पुन्हा कधी एकदा बोलतोय असं होतं, तो ओलावा म्हणजे प्रेम. "तुला काही कळत नाही" म्हणण्यापासून ते "तुझ्याशिवाय मला करमत नाही" पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.
 
सुरक्षिततेची जाणीव
आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत कोणाशी तरी स्पर्धा करत असतो. पण अशातच एखादं असं हक्काचं माणूस असणं, ज्याच्यासमोर आपल्याला 'परफेक्ट' असायची गरज नसते. ज्यासमोर काहीही मनातील मांडले तरी तो आपल्याला जज करणार नाही याची खात्री वाटते, ती सुरक्षिततेचं कोंदण म्हणजे प्रेम.

स्वीकार आणि विश्वास
आपण जसे आहोत, तसा आपला स्वीकार करणारी व्यक्ती भेटणं हे जगातील सर्वात मोठं भाग्य आहे. तुमच्या उणिवांसह, तुमच्या स्वभावासह आणि तुमच्या साध्यापणासह जो तुम्हाला आपलंसं करतो, ते खरं प्रेम.

प्रेमाची काही छोटी रूपं अशी देखील असतात -
भर गर्दीत आपला हात आपोआप कोणीतरी हळूच घट्ट पकडणं.
तुम्ही घरी पोहोचलात का? हे विचारण्यासाठी आलेला एक छोटासा मेसेज.
तुम्हाला आवडणारी गोष्ट तुमच्यासाठी राखून ठेवणं.
तुमच्या प्रत्येक वेड्या कल्पनेत "मी आहे तुझ्यासोबत" असं न सांगता वागणं.
 
शेवटी इतकंच... प्रेम म्हणजे फक्त सोहळा नाही, तर ती एक साथ आहे. जी तारुण्याच्या गुलाबी दिवसांपासून ते म्हातारपणी हातात काठी येईपर्यंत तशीच राहते.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

Teachers Day Wishes Images शिक्षक दिन शुभेच्छा संदेश मराठी फोटो

साडीला 'फॉल' लावणे का गरजेचे आहे? आजीच्या काळातील या परंपरेमागचं 'खास गुपित'!

Teachers Day Special: शिक्षकांचे तोंड गोड करण्यासाठी 'या' सोप्या आणि ट्रेंडिंग रेसिपीस नक्की ट्राय करा

कानदुखी कमी करण्यासाठी आहारात करा या ७ पदार्थांचा समावेश!

UCO Bank Recruitment : युको बँकेत २० व्यवस्थापक पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

पुढील लेख
Show comments