Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेम जागृत करणारे हार्मोन्स

Published: शुक्रवार, 18 मार्च 2016 (11:25 IST)
टेस्टॉस्टेरोन कमी का होतात?
पुरूष व महिलामध्ये निर्माण होणारा प्रचंड तणाव, कंबरदुखी, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधीमुळे टेस्टॉस्टेरोन निष्क्रीय होतो. अति मद्य सेवनही टेस्टॉस्टेरोन संपुष्टात आणण्‍यास कारणीभूत ठरत असते.

टेस्टॉस्टेरोनमध्ये कशाने होते वाढ?
व्यायाम व तणावमुक्त जीवनशैली टेस्टॉस्टेरोनच्या वृध्दीस कारणीभूत ठरते. बदाम, शेंगदाणे व अक्रोड रोज खाण्याने आपल्या शरीरात टेस्टॉस्टेरोनचे प्रमाण राखले जाते. प्रसंगी डॉक्टरही हार्मोन्सचे इंजेशनही देतात.

एस्ट्रोजनची उत्पत्ती -
पुरूष कितीही ताकदवान असला तरी त्याच्या शरीरात एस्ट्रोजन हार्मोन्स उत्पन्न होत असतातच. महिलानाही या हार्मोन्सची आवशक्यता असतेच. एस्ट्रोजन हार्मोन्स महिलाच्या मासिक चक्राला नियंत्रित ठेवते. याच हार्मोन्समुळे स्त्री पुरूषाच्या सहवासात मंत्रमुग्ध होत असतो. महिलामध्ये एस्ट्रोजनचे प्रमाण अधिक असल्याने ती अधिक सुंदर व आकर्षक वाटते.

एस्ट्रोजन कशाने कमी होतात?
तणाव
जलद गतीने वजन कमी होणे
खूप डायटींग करणे

एस्ट्रोजन कशाद्वारे वाढवाल?
डॉक्टराच्या सल्ल्याने औषधांचे नियमित सेवन.
गहू व सोयाबिनचे पदार्थ अधिक सेवन.
दररोज दोन कप कॉफी घेतल्याने एस्ट्रोजन वाढवता येते.

 
ND
ऑक्सीटोसीन-
ऑक्सीटोसीन नावाचे हार्मोन्स नात्यामधील ऋणानुबंध वाढवतो. महिला-पुरूषांच्या मेंदूत तयार होणारा हा हार्मोन्स आहे. याने तणाव कमी होतो तसेच प्रजननाला गती मिळते. नवजात शिशू व त्याची माता यांच्यातील नाते दृढ होते.

ऑक्सीटोसीन कशामुळे कमी होतो?
शारीरिक स्पर्शाच्या अभावामुळे ऑक्सीटोसीन हार्मोन्स संपुष्टात येते.

ऑक्सीटोसीन कशाने वाढवाल?
खजूर अधिक सेवन केल्याने ऑक्सीटोसीन हार्मोन्सची वृध्दी करता येते. महिलांकडे प्रणयाच्या दृष्टीने पाहणे, महिलांना स्पर्श करणे किंवा अलिंगन देणे या क्रियेत मोठ्या प्रमाणात ऑक्सीटोसीन हरमोन्स प्रवाहित होत असतो.

नॉरएपिनेफ्रिन-
नॉरएपिनेफ्रिन नावाचा हार्मोन्स पहिल्या स्पर्शच्या वेळी मनात भीती निर्माण करत असतो. या हार्मोन्समुळे पुरूष अधिक उत्तेजित होत असतात. तसेच नॉरएपिनेफ्रिन हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने त्याचा प्रतिकूल परिणामही होत असतो.

डोपपामिन-
डोपपामिन हरमोन्सला 'फील गुड' केमिकलही म्हटले जाते. पहिली भेट...पहिली नजर...आयुष्यभराची करून टाकण्याची ताकद या हरमोन्समध्ये असते.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची १० लक्षणे; ही चिन्हे दिसताच सावध व्हा

मुलांसाठी 'ह' अक्षरावरून ५० सुंदर आणि अर्थपूर्ण मराठी नावे

श्रावण स्पेशल: कांदा-लसूण न वापरता बनवा ५ झटपट पदार्थ

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

साखर न वाढता गोड खायचंय? हे 7 हेल्दी पर्याय जरूर जाणून घ्या