शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. नरेंद्र मोदी
Written By
Last Updated : गुरूवार, 13 सप्टेंबर 2018 (17:11 IST)

नरेंद्र मोदी यांचे बालपण आणि कुटुंब

1. नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर येथे मध्यमवर्गीय वाणी कुटुंबात झाला. हे गाव 2500 वर्ष जुन असून याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. एकेकाळी वडनगर गुजरातची राजधानी होती. येथील हाटकेश्वर मंदिर फार प्रसिद्ध आहे.
2. नरेंद्र मोदी या रस्त्यांवर खेळून मोठे झाले.
3. युवा नरेंद्र मोदी घंटोन घंटे या तलावात पोहत होते.
4. नरेंद्र मोदींनी आपले बालपण येथे घालवले होते. काही वर्षांअगोदर हे घर विकण्यात आले असून येथे आता एक नवीन इमारतीचे निर्माण झाले आहे.
5. हे नरेंद्र मोदी यांचे हायस्कूल आहे, नरेंद्र मोदी येथील प्रभावी विद्यार्थी होते व नेहमी प्रथम 5 मध्ये ते येत होते.
6. शाळेनंतर नरेंद्र मोदी यांनी संघात प्रवेश घेतला होता. नरेंद्र मोदींच्या कुटुंबात एक संत आले होते आणि त्यांनी मोदींची पत्रिका बघून सांगितले होते की हा मुलगा मोठा होऊन संत किंवा महान नेता बनेल हे निश्चित आहे.
7. हाटकेश्वर मंदिर.. नरेंद्र मोदींच्या मनात हाटकेश्वरसाठी फार श्रद्धा आहे.
8. नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास मुलचंद यांची चहाची दुकान होती. लहानपणी शाळेची सुटी झाल्यानंतर नरेंद्र मोदी चहाच्या टपरीवर जाऊन वडिलांची मदत करत होते.