Dharma Sangrah

भान

सौ. माधुरी अशिरगडे

वेबदुनिया
बुधवार, 2 मे 2012 (17:37 IST)
WD
मी चोखाळलेला मार्ग
माझ्या पायांनी जखमी झाला
तुझा प्रत्येक प्रसव
माझ्या अस्तित्वानं वांझोटा झाला
माझ्या व्यक्तित्वाच्या सभोवतीच
का असावं हे नतद्रष्ट वलय
का सांगाळता येऊ नये मला
सामान्यत्वाची सहज लय
प्रत्येक अमृतमयता
पियुष का न व्हावी माझ्या हस्तक्षेपाने
पुन्हा पुन्हा तो नश्वर स्वाभिमान
मग खोटा झाला पळापळाने
मी जेव्हा जेव्हा दु:खाचा महाप्रलयच पाहिला
सुखाचा साक्षात्कार
फक्त त्या 'नोहा' लाच झाला
माझी मानसिकता
हतबल होणारी कदापि नाही
माझ्याच आकांक्षांनी
का असावं सदा विदेही
मला ओळखायचं होतं
त्या मूलभूत स्वत्वाला
नव्या आत्मभानाचं राऊळ
आणायचं होतं आकाराला...

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

वटपौर्णिमेच्या उपवासाला ट्राय करा रताळ्याचे मऊ, लुसलुशीत गुलाबजाम

Vat Purnima Wishes for Husband in Marathi नवऱ्याला वटपौर्णिमा शुभेच्छा

यकृत निरोगी ठेवण्यासाठी या सुपरफूड भाज्यांचा आहारात समावेश करा

Career in Diploma In Textile Engineering :डिप्लोमा इन टेक्सटाईल इंजिनीअरिंगमध्ये करा करिअरची सुरुवात! जाणून घ्या पात्रता

Vat Purnima Wishes for Wife in Marathi पत्नीला पाठवा खास वटपौर्णिमेच्या शुभेच्छा

Show comments