Dharma Sangrah

मराठी कविता : स्वभाव

वेबदुनिया
WD
ऊठसूठ इथं तिथं धावणार्‍या
मनाला दटावून
गप करून
यशोदेच्या कृष्णासारखं
बांधून ठेवलं एका खुंटाला.

चंचल मनाचा जोर इतका
की, खुंटसुद्धा खिळखिळा झाला
मनाला आवर घालता घालता
पार मोडून गेला

मनांत आलं
खुंटाच्या कृत्रिम बंधनात
राहण्याचा जर मनाचा
स्वभाव असता
तर जीवन पार
एकछापी, एकसुरी, बेचव
झालं असतं.
जगण्यातलं सगळं
चैतन्यचहरपलं असतं

आणि मग कृष्णलीलांचा
सर्व रंगच विरून
गेला असता.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नेहमीची कचोरी खाण्याऐवजी कचोरीचे हे ५ भन्नाट प्रकार नक्की ट्राय करा

करवंद खा आणि राहा निरोगी! जाणून घ्या करवंदाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

BARC Paramedical Recruitment 2026: भाभा अणुसंशोधन केंद्राने पॅरामेडिकल प्रवर्गातील गट 'ब' मधील सहा पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली

Makeup Tips: वयापेक्षा १० वर्षांनी तरुण दिसायचे असेल, तर मेकअप करताना या सोप्या टिप्स अवलंबवा

Health Tips: राजमा खाणे कोणासाठी धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Show comments