suvichar
✕

'लेखनाचे संस्कार सोडून जात नाहीत'

Published: रविवार, 3 मे 2009 (16:16 IST)
लेखक आपले शब्द कागदावर उमटवतो, वक्ता ते श्रोतृहृदयावर उमटवतो. कागदावरचे शब्दसुद्धा कालांतराने विसरले जाऊ शकतात. काही काळ त्यांनी केलेला संस्कार बाकी कायम राहतो. पुढे पुढे लेखकाचे व पुस्तकाचे नावही लक्षात राहत नाही. पण त्या लेखकाने आपल्या लेखनाद्वारे केलेले संस्कार माणसाला सोडून जात नाहीत. लेखनामुळे त्याच्या वृत्तीत, जाणिवेत व एकूणच मानसिकतेत जो सूक्ष्म बदल झालेला असतो, तो तात्काळ लक्षात येत नाही. विद्वत्ता व बहुश्रुतता प्रदर्शित करण्यासाठी पुष्कळदा लेखनातील काही अंश उपयुक्त ठरतात ही गोष्ट खरी आहे. पण त्या उद्धरणांचा माणसाच्या मानसिकतेशी संबंध अल्प असतो व प्रदर्शनप्रियतेशी अधिक असतो. व्याख्यानाच्या बाबतीत तेवढे करता न आले, तरी अंतरिक संस्कारशीलतेच्या दृष्टीने लेखन आणि वक्तृत्व यांच्यातील साम्य लक्षात यायला हरकत नाही.

( पणजी येथे १९९४ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनातील भाषणाचा सारांश)

( छायाचित्र सौजन्य विवेक रानडे)
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Oats Foot Scrub फक्त २० रुपयांच्या ओट्सने १० मिनिटांत पायांचा थकवा चुटकीसरशी होईल दूर

हिवाळ्यात बाजरी खाण्याची सवय लावा; वजन कमी होण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत मिळतील अनेक फायदे!

सर्व वयोगटातील महिलांसाठी ही ३ योगासने सर्वोत्तम; दररोज फक्त १० मिनिटे करा

रेशमी, लोकरी आणि काश्मिरी कपड्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्स फॉलो करा!

तेनालीरामाची कहाणी : एक भाकरी, शंभर लढाया

Show comments