शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (09:20 IST)

९० व्या मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून डोंबिवलीमध्ये सुरूवात

sahitya sammelan
९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून डोंबिवलीमध्ये सुरूवात होत आहे. रविवारपर्यंत रंगणाऱ्या या उत्सवासाठी साकारण्यात आलेली पु.भा.भावे ही साहित्यनगरी सज्ज झाली आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन असणार आहे.  यंदा संमेलनात भाषण, चर्चा, परिसंवाद, मुलाखती आणि काव्याचा जागर होणार आहे. यंदा युवापिढीचे लक्ष वेधून घेण्यासाठी तयार करण्यात आलेली लेखणी आणि मराठी साहित्याचा इतिहास उलघडणारे साहित्यपार्क आणि संमेलनासाठी तयार करण्यात आलेले सभामंडप खास आकर्षणाचा विषय आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला  सायंकाळी ४ वाजता सुरूवात होणार आहे.