Daily Horoscope

Keep the house cool घरातील थंडावा कायम राखा!

Updated: मंगळवार, 16 मे 2023 (22:05 IST)
 
वीज बचतीकरता एसी हा त्याच्या कम्फर्ट झोनमध्येच असावा. म्हणजेच त्याचे तापमान 24 ते 26 अंशांपर्यंत असावे. 16 अंशांपेक्षा कमी तापमान ठेवू नये, यामुळे वीजपुरवठा जास्त लागतो.
 
घराच्या खिडक्यांना पडदे लावून खोलीचे सूर्यकिरणांपासून रक्षण करावे. सूर्यकिरणाच्या झोतामुळे एसीला थंडावा निर्माण करण्यास अडथळा निर्माण होतो. एसीचं आऊटडोअर युनिट अडगळीत ठेवू नका. त्याच्याभोवती हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
 
उष्णता निर्माण करणार्‍या वस्तूंना एसी युनिटपासून दूर ठेवा. युनिटच्या फॅनची दिशा योग्य ठेवा. एसीच्या आऊटडोअर युनिटलाही सूर्यकिरणांपासून दूर ठेवा. गरज भासल्यास छप्पर लावा.
फ्रीज साफ करताना
रिकाम्या फ्रीजमधील शेल्फ आणि ड्रॉवरबाहेर काढून थोडीशी साबण पावडर मिसळलेल्या पाण्यात कापड बुडवून पुसून घ्यावं. डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा मिसळलेल्या पाण्यात कापड बुडवावं आणि त्याने फ्रीज साफ करावा.
 
फ्रीज पुसून झाल्यावर अर्धे कापलेले लिंबू त्यात ठेवावे.
 
फ्रीज स्वच्छ करताना गरम पाणी, अतिरिक्त साबण पावडर किंवा टोकेरी वस्तू वापरू नयेत. आधी सर्व सामान बाहेर काढून फुकट गेलेली फळं, भाज्या फेकून द्यावीत. गरजेचं सामान सुरक्षित ठिकाणी ठेवणे.
 
फ्रीज घेताना
फ्रीज नेहमी सपाट जागेवर ठेवावा. उंच सखल भागावर तो हलता राहिल्यास त्याचा कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते.
 
फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये. गरम पदार्थामुळे कॉम्प्रेसरवर दबाव येऊन फ्रीजची क्षमता कमी होते व फ्रीजमध्ये जीवाणू वाढून इतर पदार्थ खराब होण्याची शक्यता असते.
 
फ्रीज भिंतीपासून 5-6 इंच आणि गॅसपासून 6 फूट लांब ठेवावा किंवा हवेशीर जागेवर ठेवावा. कारण कॉम्प्रेसरमधून येणारी गरम हवा खेळती राहिली नाहीतर पुन्हा येणार्‍या हवेमुळे उष्णता काढून त्याचा परिणाम फ्रीजच्या तापमानावर होतो.
 
फ्रीजचालू असताना त्याचा दरवाजा 20-25 सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये. दरवाजा जास्त वेळ उघडा राहिल्यास फ्रीजच्या आतील तापमानात वाढ होऊन कॉम्प्रेसर थंडावा मिळवण्यासाठी जास्त वेळ घेतो त्यामुळे वीज बीलही वाढते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments