Festival Posters

तुमच्या जीन्ससाठी वापरा DIY टेक्निक

Updated: मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (17:24 IST)
 
एम्ब्रॉयडरी - सुई आणि धागा वापरून जीन्सवर सुबक एम्ब्रॉयडरी डिझाईन करू शकता, जीन्सवर भरतकाम जीन्सला नवीन बनविण्यास उत्तम मार्ग आहे. कॉन्ट्रास्ट थ्रेड्स वापरुन भरतकाम टेक्स्ट किंवा छोट्या चैन हि वापरू शकता. तसेच जीन्सवर चामड्याचे तुकडे, चामड्याच्या स्ट्रिप्स, धावते टाके वापरून तुमच्या जीन्सला उत्कृष्ट लूक्स मिळेल.
 
DIY पॅचवर्क - आपल्या जीन्सची दुरुस्ती आणि त्याचे आयुष्य वाढविण्यासाठी हे एक उत्तम तंत्र आहे. गुडघ्या सभोवतालचा भाग फाडून घ्या आणि फाडलेल्या जागेवर पॅचवर्क करा त्यामुळे, जीन्स मजबूत होण्यास मदत होऊ शकते. आपल्याला वेगवेगळ्या शेड्ससाठी डेनिम स्क्रॅप्स, सुई आणि थ्रेड आवश्यक आहेत.
 
बॅज - आपल्या जीन्समध्ये बॅज जोडून वेगवेगळे लुक मिळवण्याचा आणखी एक उत्तम मार्ग. आपल्याला ग्रन्गी मिलिटरी लुक किंवा प्रीप्री स्पोर्टी हवा असेल तरीही बॅज हा आपल्या पोशाखाला वैयक्तिकृत करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
डूडल आर्ट - या हंगामात बाजारात टक्कर देण्यासाठी सर्वात मोठा ट्रेंड म्हणून डूडलचा ट्रेंड चा समावेश आहे, डूडल आर्ट परिधान करायलाही तितकाच मजेशीर आहे. त्यासाठी आपल्याला फक्त एक्रिलिक पेंट्स, काही ब्रशेस आणि आपल्या डेनिम जीन्सची आवश्यकता आहे.
 
आपला डेनिम सपाट पृष्ठभागावर ठेवा आणि आपण डूडल करू इच्छित असलेला भाग चिन्हांकित करा. आसपास भिन्न जाडी डिझाईन आणि पोत यांचे ब्रशेस वापरा. एकदा संपल्यानंतर ड्रायर वापरा किंवा जीन्स सुकविण्यासाठी उन्हात ठेऊ शकता.
 
पेंट स्प्लॅटर - जर तुम्हाला त्वरित ब्रश स्ट्रोक करणे पसंत असेल आपली जीन्स दोन हुकांवर लटकवा आणि पेंटचे वेगवेगळ्या थेम्ब सोडून द्या, शिंपडा.
 
स्टॅन्सिल प्रिंटिंग - आपण लहान असताना प्रथम क्राफ्ट्स वर्गामध्ये स्टेंसिल शिकलात ते आठवा? आपल्या डेनिमवर डिझाईन जोडण्याचा हा खरोखर एक मजेदार मार्ग आहे. डेनिमवर बाह्य स्टेंसिल ठेवा आणि आपल्या जीन्सवर विविध डिझाइन मिळविण्यासाठी पेंटब्रश वापर करा.
 
डिसचार्ज इफेक्ट - तुमच्या डेनिमला ब्लिच केलात तर डेनिमला नवीन फ्रेश लुक मिळेल. पण हे करताना हात मोजे वापरण्यास विसरू नका.
 
ओम्ब्रिफेक्ट - डेनिम तुमच्या जीन्सला ब्लु डेनिमपासून ब्लीच्ड व्हाइट ग्रेडेशन इफेक्ट देते. प्रथम आपल्या जीन्सच्या टोकाचे पाय कंटेनरमध्ये बुडवा, काही इंच खोल. काही मिनिटांसाठी त्यास धरा, काढा, धुवा आणि वाळवा.
 
पेंट ब्रश - ब्लिचमध्ये बुडलेल्या पेंटब्रशचा वापर करून थेट जीन्सवर डूडल करा. हे डेनिममधून इंडिगो रंग काढण्यास आणि मनोरंजक डिझाइन आणि आकृती तयार करते. आपण ब्रश, जॅक्सन पोलॉक स्टाईल वापरुन ब्लीच देखील करू शकता. हे ८० चे अ‍ॅसिड वॉश लुक तयार करते.
 
टवील टेप्स, स्टड आणि मणी - उच्च फॅशन मेकओव्हरसाठी नमुनेदार टवील टेप आणि मणी स्टिच करून आपल्या जीन्सचे परिवर्तन करा. स्टड आणि पिनसह डेनिम सुशोभित करून पंक रॉक वाईब मिळवा.
 
प्रेरणा देण्यासाठी अनेक उत्तम तंत्रे आणि आश्चर्यकारक ट्रेंडसह, पुन्हा कधीही कंटाळवाण्या जीन्ससोबत जुळवून घेऊ नका. आपल्याला फक्त आपली रचनात्मकता टॅप करण्यासाठी रिकामी दुपार आणि आपल्या ब्लूज दूर करण्यासाठी काही सोप्या साधनांची आवश्यकता आहे.
 
श्री. अभिषेक यादव, डिझायनर हेड, स्पायकर लाइफस्टाईल

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे काय? जाणून घ्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ही झोपण्याची पद्धत

लग्नानंतरची पहिली गणेश चतुर्थी खास बनवा; पती-पत्नीने एकत्र अशी करा गणपतीची स्थापना आणि पूजा

नैतिक कथा : ससा आणि कावळा; गोष्ट प्रामाणिकपणाची

गणेशोत्सवासाठी मराठमोळा साज! नथ, ठुशीपासून पेशवाई कंगनापर्यंत, या दागिन्यांनी खुलवा तुमचा एथनिक लुक

तुमच्या चॉपिंग बोर्डला वास येऊ लागला, तर काही मिनिटांतच तो स्वच्छ करा

पुढील लेख
Show comments