Marathi Biodata Maker
✕

Wedding Shopping Tips : लग्नाची खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Updated: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (18:02 IST)
 
1 लग्नाचा लेहेंगा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही स्वतःसाठी लग्नाचा लेहेंगा खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. थोडे कष्ट करून तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. एका दुकानाऐवजी मार्केटमधील अनेक दुकानांना भेट द्यावी. पैसे कमी केल्यानंतरच लेहेंगा खरेदी करा.
 
2 गरजेनुसार वधूचे दागिने खरेदी करा
बरेचदा लोक वधूचे लग्नाचे दागिने, एंगेजमेंट रिंग , ब्राइडल सेट, सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करतात, अशा परिस्थितीत हवे असल्यास सोन्या-चांदीच्या आवश्यक वस्तू घ्या. सोन्यासारखे दिसणारे आर्टिफिशिअल दागिनेही बनवू शकता. यामुळे तुमचे खूप पैसे वाचतील. कारण असे अनेक दागिने आहेत जे लग्नानंतर स्त्रिया पुन्हा घालू शकत नाहीत.
 
3 ऑनलाइन शॉपिंग करा 
असे अनेक अॅप्स ऑनलाइन आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही लग्नासाठी शॉपिंग करू शकता. असे केल्याने तुम्ही खूप पैसे वाचवू शकता. ऑनलाइन साइटवरील किंमतींची तुलना करून खरेदी करा. बर्‍याच साइट्सवर, आवश्यक असलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत सहज मिळतील.
 
4 लग्नासाठी बजेट आखून घ्या 
लग्नासाठी आवश्यक गोष्टींची यादी तयार केल्यानंतर, बजेट बनवणे खूप सोपे होईल. बजेट तयार करण्यासाठी वेडिंग प्लॅनर किंवा अनुभवी मित्र किंवा नातेवाईकाची मदत घ्या. यामुळे खरेदी करताना गोंधळ होणार नाही. खरेदी करताना घाई करू नका आणि बार्गेनिंग करा.
 
5 कमी खर्चात लग्नपत्रिका छापून घ्या
तुम्हाला स्वस्त दरात लग्नपत्रिका मिळतील. लग्नाच्या खरेदीसोबतच लग्नपत्रिका बनवायची असेल तर ती स्वस्त दरात बनवण्याचा प्रयत्न करावा. नंतर या पत्रिकेचा काही वापर नसतो लग्नाच्या पत्रिकेसाठी एवढा वायफळ खर्च करण्याची गरज नाही. 

Edited by - Priya Dixit 
 
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

तुम्हाला वारंवार सर्दी होते का? हे आयुर्वेदिक उपाय करून पहा!

Baby girl names inspired by Lord Rama प्रभू श्रीराम यांच्या नावावरुन मुलींची नावे

दसऱ्याच्या गोडधोडासाठी बनवा घट्ट आणि मलाईदार बासुंदी; घरच्या घरी मिळेल हलवाईसारखी चव

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर बाळासाठी निवडा प्रभू श्रीरामांची ही खास आणि युनिक नावे

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

पुढील लेख
Show comments