ganesh chaturthi
✕

देवीची ओटी

Updated: शनिवार, 9 ऑक्टोबर 2021 (13:20 IST)
 
अखेर ती बस पकडून मंदिरात पोचली, सासूबाई तिचीच वाट बघत होत्या..
"हे काय?? ड्रेस वर आलीस?? साडी तरी घालायची..."
"अहो आई इथून सरळ ऑफिस ला जायचं म्हणून.."
"काय बाई आजकालच्या मुलींना देवाधर्माचं काही कळत नाही..बरं चल ओटी भरून घेऊ.."
 
दोघीजणी आत गेल्या...तिथे एक वृद्ध पुजारी होते...देवीसमोर ओटी ठेवली की ते घेत असत..आणि आत गाभाऱ्यात देवीला ठेवत..
 
त्यांना पाहून नीरा हसली, त्यांनीही प्रतिसाद दिला..
"तुम्ही ओळखता काय एकमेकांना??"
"हो...आम्ही.."
"ते जाऊदे, गुरुजी ओटी भरून घ्या देवीला.."
 
सासूबाई तिला तोडत म्हणाल्या... सासूबाईंनी साग्रसंगीत एकेक वस्तू परंपरे प्रमाणे देवीला वाहिली... नीरा गोंधळून गेली... तिला काही समजेना नक्की काय करायचं..
"आधी हळद कुंकू वाहा... अगं हे बोट नाही, त्या बोटाने.. आता अक्षता.. आता साडी ठेव, त्यावर पाच मुठा तांदूळ... एक मूठ परत घे... नारळ दे..."
 
नीरा सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे सर्व करत होती..सासूबाई मधेच ओरडल्या..
"अगं ही कुठली साडी?"
"मी दिवाळीत काही साड्या घेतलेल्या, ही काही वापरत नाही मी.."
"अगं एक दीड हजार ची साडी आहे ती... देवीला साधी 100 रुपयाची साडी द्यायची असते.. अरे देवा.. दिवाळी काढणार ही मुलगी... आणि हे तुप कुठलं?"
"घरी कढवलेलं..."
"अगं दिव्यासाठी बाजारातून स्वस्तातलं तूप आणायचं... आणि ह्या बांगड्या??"
"माझ्याच... नवीन घेतलेल्या, पण वापरल्या नाहीत.."
 
सासूबाई डोक्याला हात लावतात... देवीला हात जोडतात, "देवी माते... सुनबाई अजून नादान आहे, तिची चुकी माफ कर, आणि ओटीचा स्वीकार करून आम्हाला पाव बाई.."
 
गुरुजी सगळं बघत असतात, हे सगळं बघून म्हणतात..
"देवी तुम्हाला नाही पण तुमच्या सूनबाईला पावेल हो.."
"काय?"
 
"होय... तुम्ही पूजा करताना स्वस्त, टाकून दिलेल्या, आपल्याला उपयोगात नसलेल्या वस्तू देवाला वाहतात, पण तुमच्या सुनेने घरी काढवलेल्या तुपाचा दिवा लावला, तिचीच एक साडी देवीला दिली, स्वतःच्याच बांगड्या देवीला दिल्या... देवीला तुम्ही जे अर्पण करता त्याच्यामागचा भाव हवा असतो.. तुमचा मोह तूप, साडी, बांगड्यांत आहे... पण तुमच्या सुनेने कसलाही मोह न धरता स्वतःच्याच वापरातील एक भाग काढून देवीला दिला... हेच महत्वाचं असत... एखादा लहान मुलगा आपला आवडता खाऊ खात असताना एक घास हळूच आईला भरवतो तेव्हा आईला किती कौतुक वाटतं, तेव्हा उष्टा घास भरवला म्हणून आई रागवत नाही... तसंच आहे हे... आणि देवीला मिळालेल्या चांगल्या वस्तू मी अनाथाश्रम मध्ये देऊन येतो, तुमच्या सुनेशी तिथेच भेट झालेली, ती दर महिन्याला तिथे देणगी देऊन येते..."
 
सासूबाईंना खूप वाईट वाटलं, देवाधर्माचं करत नाही म्हणून आपण सूनबाईला किती बोललो, पण खऱ्या अर्थाने तीच खरी भक्ती करतेय..आपण फक्त स्वार्थीपणाने मोहात अडकून यांत्रिक पूजा करतोय याची त्यांना जाणीव झाली.
 
साभार: सोशल मीडिया

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे काय? जाणून घ्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ही झोपण्याची पद्धत

लग्नानंतरची पहिली गणेश चतुर्थी खास बनवा; पती-पत्नीने एकत्र अशी करा गणपतीची स्थापना आणि पूजा

नैतिक कथा : ससा आणि कावळा; गोष्ट प्रामाणिकपणाची

गणेशोत्सवासाठी मराठमोळा साज! नथ, ठुशीपासून पेशवाई कंगनापर्यंत, या दागिन्यांनी खुलवा तुमचा एथनिक लुक

तुमच्या चॉपिंग बोर्डला वास येऊ लागला, तर काही मिनिटांतच तो स्वच्छ करा

पुढील लेख
Show comments