Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हिलचेअर

Updated: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (09:49 IST)
 
नकळत माझ्या तोंडून "अरे वाह!"  निघून गेलं..
 
आजी पुढे सांगू लागल्या... माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत..
 
अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजिचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्या बद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटर मध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.
 
आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉल मध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. 'बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'"
 
हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, "कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?"
 
आजीबाईंनी लगेच सांगितलं, "यहिपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।"
 
मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.
 
ते म्हणाले, "आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्बेत चांगली राहायला मदतच होते ना."
 
आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, "माझ्या आईला तुमची सोबतच झाली" म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..
 
 कुठे ही परिस्थिती नी कुठे 'आईवडील नकोत' ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थिती बाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.
 
वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी 'आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा' ही भावना..
 
अशी ही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हां दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि किती तरी वेळ आम्ही शांत पणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृती कडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही...
 
- सोशल मीडिया

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

''मसाला वडा''दक्षिण भारतातील लोकप्रिय आणि कुरकुरीत स्नॅक रेसिपी

हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी या ५ सोप्या टिप्स फॉलो करा; आहारात करा हे बदल

गुळाचा फेस पॅक त्वचेसाठी ठरेल फायदेशीर? जाणून घ्या फायदे आणि वापरण्याची योग्य पद्धत

गर्भधारणेपूर्वी जीवनशैलीत करा हे महत्त्वाचे बदल; आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी ठरतील फायदेशीर

योग हा प्रत्येक मानसिक आजार, चिंता आणि नैराश्यावरचा उपाय आहे, इतर फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments