Marathi Biodata Maker

ती.... कोणी ती?

मनोहर विष्णु धडफळे
ऑफिसला जायचं म्हणून मी घराबाहेर पडलो.
ND
कंपाऊंडचं दार उघडलं तेव्हां पावसाची भुरभुर सुरु झाली होती. मी छत्री उघडली. त्याच वेळेस सहज समोर पाहिलं. ती सुद्धा आपल्या कंपाऊंडच्या बाहेर येऊन उभी होती. आमच्या नजरा भिडल्या. पण मी लेगच मान वळवून घेतली. तिनं सुद्धा आपल्याकडे पाहू नये असंच मला वाटलं. मी आपल्या मार्गाने चालू लागलो. थोडं अंतर चालून गेल्यानंतर सहज मागे वळून पाहिलं. ती अगदी माझ्या मागेच होती. माझ्या पावलावर पाऊल टाकूनच येत होती जणू. तिला टाळावं म्हणून मी अधिक वेगानं चालू लागलो. पण तहीही हट्टी होती. धावत धावत आली अन् माझ्या उजव्या बाजूस येऊन माझ्या बरोबरच चालू लागली. आता पाऊस वाढत होता. मी छत्रीचा आडोसा करून चालू लागलो. पण ती मजेत पावसात भिजत येत होती. रस्त्याच्या बाजूला चिखल होता. मला रस्त्यावरुन चालणं भाग होतं. आता ती माझ्या अंगलटीस येऊन चालू लागली.

मला तिचा स्पर्श जाणवू लागला. मी छत्री थोडी खाली केली अन् वाकून चालू लागलो. चोरट्या नजरेनं अधून मधून तिच्याकडे पाहून घेत होतो. ती चुपचाप माझ्या बाजूने चालत होती. बहुधा मी तिच्याशी बोलावं अशी तिची अपेक्षा होती. मी उंच तर ती ठेंगणी. मी गोरा तर ती काळी. रस्त्यावर चालताना मलाच संकोच वाटत होता. पण ती निर्विकार होती. समोरुन येणारे पादचारी माझ्याकडे पाहून खुदकन हसायचे अन् पुढे जायचे. पण तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं.

ND
माझं ऑफीस जवळ आलं तसं मला हायसं वाटलं. या स्थितीतून सुटका होणार होती ना. मी ऑफीसच्या आवाराचं फाटक उघडण्याकरिता म्हणून तिकडे नजर वळविली, अन् तिनं आपल्या कमरेचा धक्का मला दिला अन् पुढे चालती झाली. मी तोल जाऊन चिखलात पडलो. मी रागानं तिच्याकडं पाहिलं. पण ती स्थितप्रज्ञासारखी पुढे जात होती. कशी जिरली एका माणसाची हे दाखविण्याकरिता माझ्याकडे न बघता आपली शेपटी हलवित निघून गेली. ती म्हणजे समोरच्या हणमंतरावांची काळी गाय हो.

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

या ५ गोष्टींबद्दल शाळेत कधी शिकवलंच जात नाही

वटपौर्णिमा विशेष: यंदाच्या उपवासाला नक्की करून पाहा 'या' ३ सोप्या आणि टेस्टी रेसिपीज!

पौष्टिक आणि चविष्ट, झटपट आणि मोकळा-सुटसुटीत Bottle Gourd Pulao

रोजच्या १० मिनिटांच्या या सवयीमुळे मेंदू अधिक सक्रिय राहू शकतो

BEML भरती २०२६: ३६२ ITI ऑपरेटर पदांसाठी सुवर्णसंधी; पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Show comments