Festival Posters

मदत

- नीता श्रीवास्तव

ND
झोपडीत बिचारी एकटीच रहात होती. त्या तिच्या झोपडीत पुराचं पाणी शिरले होते. मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात घरातलं काहीही वाचवू शकली नाही. अगदी धान्यापासून भांड्यांपर्यंत सगळं काही पाण्यात वाहून गेलं.

पण ती मेहनती होती. कंबर कसून कामाला लागली. दोन वेळच्या जेवणासाठी तिने कुणापुढेही हात पसरले नाहीत. त्याचवेळी वस्तीत बातमी आली. सरकार पूरग्रस्तांना मदत देणार आहे. मदतीविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तिने आलेल्या कॉन्स्टेबललाच विचारलं, ' सायेब, माझ्या झोपडीत बी पानी शिरलं व्हतं. मला सरकारची मदत मिळंल का?'

कॉन्स्टेबल उद्गारला, 'का नाही? तू तर एकटीच आहेस. मग सरकारच का? सगळ्यांनीच तुला मदत केली पाहिजे. मी करील तुला मदत. काहीही लागलं तर मला सांग'

तिला भरून आलं. आभाळ कोसळलेल्या प्रसंगात कुणी तरी तिला प्रेमाच्या चार शब्दांचा आधार दिला. हात जोडून ती आभारच मानत होती, तेवढ्यात कॉन्स्टेबल पुन्हा म्हणाला, ' अगं काय सांगतो ते पूर्णपणे ऐक. चालली 'फ्रंटियर मेल'सारखी धाड धाड. हे बघ, तू जशी एकटी आहेस, तसा मी पण इथे एकटाच आहे. बायको-मुलं दुसर्‍या गावात आहेत. मग कधी तरी येत जा माझ्याकडे.'

तिच्या पायाखालची जमिनच सरकली. ' त्याच दिवशी पुरानेच गिळंकृत केलं असतं तर बरं झालं असतं,' तिच्या मनात विचारांची आंदोलनं सुरू झाली.

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी चिडचिड? महिलांनो, ‘या’ ५ सवयींनी मिळवा मानसिक शांतता

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

सँडविचचे हे प्रकार जे अगदी झटपट बनवू शकतात; अगदी सोपी रेसिपी

Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day

Show comments