suvichar
✕

Mango Rabdi Faluda Recipe घरी अगदी सहजपणे बनवता येतो मँगो रबडी फालुदा; नक्कीच ट्राय करा

Updated: शुक्रवार, 24 एप्रिल 2026 (16:24 IST)
 
साहित्य-
आंबे (मँगो पल्पसाठी) - २ पिकलेले
दूध - १ लिटर
साखर - ३-४ मोठे चमचे
फालुदा शेव - १/२ कप
सब्जा (चिया) बिया - २ लहान चमचे
वेलची पूड - १/२ लहान चमचा
सुका मेवा - बदाम आणि पिस्ते (सजावटीसाठी)
ALSO READ: जेवणाची चव वाढवतो मँगो रायता नक्की ट्राय करा
कृती-
सर्वात आधी एका जाड बुडाच्या पातेल्यात मंद आचेवर दूध उकळून घ्या. दूध तळाशी चिकटू नये म्हणून सतत ढवळत राहा. जेव्हा दूध निम्मे होईल, तेव्हा त्यात साखर आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा. यामुळे तुमची रबडी तयार होईल. थंड होण्यासाठी ती फ्रिजमध्ये ठेवा. आता, पॅकेटवरील सूचनेनुसार फालुदा शेव उकळून घ्या, थंड पाण्याने धुवा आणि बाजूला ठेवा. सब्जा बिया १०-१५ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा, त्या फुगून येईपर्यंत.
यानंतर, मँगो पल्प तयार करा. एक पिकलेला आंबा सोलून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. इच्छित असल्यास तुम्ही थोडी साखर घालू शकता, पण आंबा गोड असेल तर याची गरज भासणार नाही. एक उंच ग्लास घ्या आणि त्यात प्रथम १-२ चमचे सब्जा बिया घाला. त्यानंतर, फालुदा शेवचा एक थर तयार करा. त्यावर आंब्याचा गर घाला, मग थंड रबडी ओता. थरांची ही प्रक्रिया पुन्हा करा. इच्छित असल्यास, सुकामेवा आणि थोड्या आंब्याच्या गराने सजवा.
तसेच आणखी रुचकर बनवायचे असल्यास, तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमचा एक स्कूप घालू शकता.  तर चला तयार आहे मँगो रबडी फालुदा नक्कीच आस्वाद घ्या. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Mango Laddu Recipe झटपट बनवा चविष्ट आंब्याचे लाडू
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: उन्हाळ्यासाठी एक अतिशय थंडगार आणि पौष्टिक पेय Mango Smoothie
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिवाळीत त्वचेला हवा पार्लरसारखा ग्लो? घरच्याघरी करा हा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!

सूर्यास्तानंतर फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य वेळ

अग्निसार प्राणायामाचे फायदे: बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी कशी होते मदत? जाणून घ्या योग्य पद्धत

वाकड्या तोंडाचा मासा; नैतिक कथा सोल माश्याची

नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळे! नारळ-गुळाच्या सारणाची खास करंजी करून पाहा

पुढील लेख
Show comments