शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (09:51 IST)

कोणता प्राणी वास्तुसाठी शुभ मानला जातो

वास्तुप्रमाणे घरासाठी बेडूक हा प्राणी अतिशय शुभ मानला जातो. परंतु बेडूक हा प्राणी पाळीव नसल्याने त्याला पाळण्याची पद्धत नाही. पावसाळ्यात घरी आलेल्या बेडकाला आपण बाहेर काढत असला तरी वास्तुशास्त्रानुसार घरात बेडूक असणं शुभ मानलं जातं. 
 
असं म्हणतात बेडूक पाण्यात असताना जो आवाज काढतो त्यामुळे तुमच्या घरात सुख-समृद्धी येते. बेडकामुळे कुटुंबातील माणसं एकत्र येतात. घरातील ताणतणाव कमी होतो. म्हणूनच घरातील समस्या दूर करण्यासाठी घरात बेडूक ठेवणे तर शक्य नाही तरी बेडकाचं प्रतिक ठेवावं. 
 
फेंगशुई शास्त्रानुसार बेडकाचे प्रतिक घरात नक्कीच ठेवता येऊ शकते. असं म्हणतात की, तीन पायांचा बेडूक घरात ठेवण्यामुळे घरात सुख समृद्धी येते. 
 
तीन पाय असलेला बेडूक
फेंग शुईमध्ये तीन पायांचा बेडूक खूप भाग्यवान मानला जातो. हा बेडूक तोंडात नाणी घेतलेला असतो. घरात या बेडकाचं प्रतिक ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजाभोवती ठेवले पाहिजे. बेडूक स्वयंपाकघर किंवा शौचालयाच्या आत ठेवू नका. असे केल्याने वास्तूचे दोष दूर होण्याऐवजी दुर्भाग्य वाढतं.
 
फेंग शुई ही चिनी वास्तुकला आहे. फेंग शुई शास्त्रात घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी बरेच उपाय केले जातात. फेंग शुईमध्ये, घरी आनंद आणि समृद्धी मिळवण्यासाठी बर्‍याच गोष्टी वापरल्या जातात. फेंग शुईमध्ये तीन पायांचा बेडूक खूप भाग्यवान मानला जातो. फेंग शुई वास्तु शास्त्र भारतीय वास्तुशास्त्रासारखेच आहे. फेंगशुई टिप्स वापरुन घरातील वास्तू दोष दूर केले जातात.