शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By
Last Modified: सोमवार, 26 डिसेंबर 2022 (23:06 IST)

Direction in Vastu वास्तुशास्त्रात दिशचे महत्व जाणून घ्या

वास्तुशास्त्रात दिशेची योग्य जागा पाहुनच घरबांधणी करण्याचे संकेत दिले आहेत. कारण घर व माणूस आकाशाकडून केंद्रीय उर्जा, सौरउर्जा तसेच प्रकाश मिळवतात. जमिनीच्या गुरुत्वाकरणाने प्रभावित होतात तसेच मुख्य दिशा व उपदिशांच्या मदतीनेच नैसर्गिक शक्ती मिळवतात.
 
सूर्य उगवतो त्या दिशेला पूर्व तर सूर्य मावळतो त्या दिशेला पश्चिम दिशा म्हणतात. पूर्वेच्या उजव्या बाजूची दिशा दक्षिण असून डाव्या बाजूची दिशा उत्तर होय. सूर्याकडे तोंड करून उभे राहिल्यास समोर पूर्व, मागे पश्चिम, उजवीकडे दक्षिण तर डावीकडे उत्तर दिशा असते.
 
ज्या ठिकाणी दोन दिशा मिळतात तो बिंदू किंवा कोनही महत्वाचा असतो कारण त्या दोन्ही दिशांपासून मिळणारी नैसर्गिक उर्जा त्या एका बिंदूच्या ठिकाणी मिळते त्याच कोनाला वा 'बिंदूला' उपादिशा म्हणतात.
 
पूर्व व उत्तर दिशेच्या मधली 'ईशान्य' दिशा
 
पूर्व व दक्षिण दिशेच्या मधली 'आग्नेय' दिशा
 
दक्षिण व पश्चिम दिशेच्या मधली 'नैऋत्य' दिशा
 
पश्चिम व उत्तर दिशेच्या मधली 'वायव्य' दिशा
 
उपादिशा आणखी दोन भागात विभागल्या जातात.
 
1. ईशान्य (पूर्वोत्तर) 1. पूर्व उत्तरपूर्व : - ईशान्य दिशेचा पूर्व भाग
2. उत्तर उत्तरपूर्व :- ईशान्य दिशेचा उत्तर भाग
 
2. आग्नेय (दक्षिणपूर्व) 1. पूर्वदक्षिण पूर्व - आग्नये दिशेचा पूर्व भाग
2. दक्षिण दक्षिणपूर्व - आग्नेय दिशेचा दक्षिण भाग
 
3. नैऋत्य (दक्षिणपश्चिम) 1. दक्षिण दक्षिणपश्चिम - नैऋत्य दक्षिण भाग
2. पश्चिम दक्षिण पश्चिम - नैऋत्य ‍पश्चिम भाग
 
4. वायव्य (उत्तरपश्चिम) 1. पश्चिम उत्तरपश्चिम - वायव्येचा पश्चिम भाग
2. उत्तर उत्तरपश्चिम - वायव्येचा उत्तर भाग