Marathi Biodata Maker
✕

Malhari Martand Navratri special श्री खंडोबाला आवडणारा नैवेद्य; भरीत भाकरी पाककृती

Updated: शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025 (17:43 IST)
वांग्याचं भरीत  
साहित्य-
मोठे वांगे- १
कांद्याची पात
हिरवी मिरची - ४  
लसूण पाकळ्या
तेल - २  चमचे
मोहरी
जिर -१/२ चमचा
हळद- १/४ चमचा
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर

कृती-
सर्वात आधी वांग्याला स्वच्छ धुवून घ्या. आता वांग्याला तेल लावून चाकूने खूप सारे भोके पाडा, आत लसूण पाकळ्या व हिरवी मिरची आत घालून गॅसवर दोन्ही बाजूनी भाजून घ्या.तसेच थंड झाल्यावर साल काढून वांगे पूर्ण मॅश करा. कढईत तेल तापवून मोहरी, जिरं, हिंग, लसूण मिरची पेस्ट, शेंगदाणे, हळद, कांद्याची पात घालून परतून घ्या. आता त्यात मॅश केलेला वांगे, मीठ घालून परतून घ्या. व शेवटी कोथिंबीर घालून साधारण एक मिनिट झाकून ठेवा.

बाजरीची भाकरी
साहित्य-
बाजरीचं पीठ - २ वाट्या
कोमट पाणी
मीठ चिमूटभर
तूप
ALSO READ: चंपाषष्ठीच्या निमित्ताने बनवा वांग्याचे काप
कृती-
सर्वात आधी बाजरीचं पीठ एका परातीत घ्या, चिमूटभर मीठ घाला. हळूहळू कोमट पाणी घालत घट्ट सर पीठ मळून घ्या.  पीठ मळून झालं की लगेच छोटे गोळे करा. दोन प्लास्टिक किंवा ओलं कापड घेऊन त्यात गोळा ठेवून हाताने दाबत-दाबत गोल भाकरी थापा. गरम तव्यावर दोन्ही बाजूनी मंद आचेवर भाजून घ्या. शेवटी गॅसवर थेट भाजल्यावर फुगते. गरमागरम भाकरीवर तूप लावा. आता भाकरी ताटात घ्या त्यावर भरीत घाला. व खंडोबाला नैवेद्यात नक्कीच ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: घरी बनवा स्वादिष्ट अशी गुलाब श्रीखंड पाककृती
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

ISRO Recruitment : ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भरती, ५ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments