Festival Posters
✕

Papaya pickle recipe पपईचे लोणचे चवीला चटपटीत आणि पचनासाठी अतिशय उत्तम

Updated: गुरूवार, 12 मार्च 2026 (21:59 IST)
 
साहित्य-
कच्ची पपई: १ मध्यम आकाराची (सोलून आणि मध्यम तुकडे किंवा लांब काप करून).
मोहरीची डाळ: २-३ मोठे चमचे.
लाल तिखट: १-२ चमचे (तिखटाप्रमाणे).
हळद: १ छोटा चमचा.
हिंग: पाव चमचा.
मीठ: चवीनुसार.
तेल: अर्धी वाटी (शेंगदाणा किंवा मोहरीचे तेल).
लिंबाचा रस: २ मोठे चमचे (किंवा व्हिनेगर).
मेथी दाणे: अर्धा चमचा (किंवा मेथी पूड).
 
कृती-
सर्वात आधी पपई सोलून त्याच्या आतील बिया काढून टाका. पपईच्या लांब फोडी करा किंवा किसून घ्या. या फोडींना थोडे मीठ आणि हळद लावून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा. त्यानंतर पपईतून सुटलेले जास्तीचे पाणी काढून टाका. एका मोठ्या बाऊलमध्ये पपईच्या फोडी घ्या. त्यात मोहरीची डाळ, लाल तिखट, मीठ आणि मेथी पूड घालून व्यवस्थित मिक्स करा. आता एका छोट्या कढईत तेल चांगले गरम करा. तेल गरम झाले की त्यात हिंग टाका आणि गॅस बंद करा. हे कोमट झालेले तेल पपईच्या मिश्रणावर ओता. तेल खूप कडकडीत नसावे, अन्यथा मसाले जळू शकतात. शेवटी त्यात लिंबाचा रस घाला. यामुळे लोणच्याला छान आंबट चव येते आणि ते टिकण्यास मदत होते.
 
काही  टिप्स-
हे लोणचे बनवल्यानंतर लगेच खाता येते, पण २-३ दिवसांनी ते अधिक छान मुरते. जर तुम्हाला हे लोणचे जास्त काळ टिकवायचे असेल, तर त्यात थोडे व्हिनेगर घाला आणि नेहमी काचेच्या बरणीत भरून ठेवा.
उन्हाळ्यात हे लोणचे फ्रिजमध्ये ठेवणे जास्त सुरक्षित असते.
जर तुम्हाला 'खाटी-मिठी' चव आवडत असेल, तर यात थोडा गूळ किंवा साखर घालू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Jackfruit Pickle घरी फणसाचे लोणचे बनवण्याची सर्वात सोपी पद्धत
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Chilli Pickle Recipe वर्षभर टिकणारे चविष्ट असे हिरव्या मिरचीचे लोणचे

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

Best Job Oriented Courses : नोकरीच्या उत्तम संधी मिळवण्यासाठी हे जॉब ओरिएंटेड कोर्सेस करा

नवरात्रीत गरबा खेळायला जाताय? आरामदायी कपडे, फुटवेअर आणि दागिने निवडण्याच्या टिप्स

वजन कमी करायचे आहे? आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा; मिळेल फिटनेसचा फायदा

या योगासनाने पोटावरील चरबी कमी होईल, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : माता दुर्गेची कथा

पुढील लेख
Show comments