Festival Posters

'प्रपोज डे' निमित्त मनातील भावना व्यक्त करित या 'स्पेशल' डिश तुमच्या जोडीदारासाठी नक्की ट्राय करा

रविवार, 8 फेब्रुवारी 2026 (08:00 IST)
रेड वेलव्हेट हार्ट कुकीज  
प्रेम व्यक्त करण्यासाठी 'हार्ट शेप' पेक्षा उत्तम काहीच नाही!
साहित्य
१.५ कप मैदा
१/२ कप लोणी
३/४ कप साखर
१ चमचा कोको पावडर
लाल फूड कलर
व्हॅनिला इसेन्स 
 
कृती
सर्वात आधी लोणी आणि साखर फेटून घ्या. त्यात मैदा, कोको पावडर आणि लाल रंग मिसळून पीठ तयार करा. हे पीठ लाटून हार्ट शेपच्या कटरने कुकीज कापून घ्या. १८० अंश सेल्सिअसवर १०-१२ मिनिटे बेक करा.आता कुकीजवर पांढऱ्या चॉकलेटने जोडीदाराचे नाव किंवा 'Marry Me?' असं लिहू शकता.
 
स्ट्रॉबेरी लव्ह शॉट 
हे दिसायला अतिशय स्टायलिश आणि रिफ्रेशिंग आहे.
साहित्य
ताज्या स्ट्रॉबेरीज
१ चमचा साखर
लिंबाचा रस
पुदिना
सोडा किंवा स्प्राइट 
 
कृती
सर्वात आधी ५-६ स्ट्रॉबेरीज आणि साखर मिक्सरमध्ये बारीक करून प्युरी बनवा. एका ग्लासमध्ये ही प्युरी, लिंबाचा रस आणि पुदिना टाका. वरून थंडगार सोडा ओता. आता ग्लासच्या कडेला एक स्ट्रॉबेरी कापून लावा.
 
चॉकलेट स्ट्रॉबेरी 'प्रपोज' बुके 
हे बनवायला सर्वात सोपे पण सर्वात प्रभावी आहे.
साहित्य
मोठ्या ताज्या स्ट्रॉबेरीज
डार्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेट
 
कृती
सर्वात आधी चॉकलेट डबल बॉयलर पद्धतीने विरघळवून घ्या. स्ट्रॉबेरी धुवून कोरडी करा आणि विरघळलेल्या चॉकलेटमध्ये अर्धी बुडवा. एका बटर पेपरवर ठेवून फ्रिजमध्ये १० मिनिटे सेट करा. या स्ट्रॉबेरीज एका सुंदर बॉक्समध्ये सजवून देताना मध्यभागी एखादी छोटी चिठ्ठी किंवा रिंग ठेवू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Propose Day Recipe जॅम हार्ट कुकीज बनवून पार्टनर समोर तुमचे प्रेम व्यक्त करा

सर्व पहा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी चिडचिड? महिलांनो, ‘या’ ५ सवयींनी मिळवा मानसिक शांतता

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

सँडविचचे हे प्रकार जे अगदी झटपट बनवू शकतात; अगदी सोपी रेसिपी

Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day

पुढील लेख
Show comments