Daily Horoscope
✕

गाजर स्टिक्स

Updated: गुरूवार, 28 जानेवारी 2010 (13:57 IST)
हिवाळा लागला की, मोठय़ा प्रमाणावर गाजर दिसायला लागतात. अगदी गाजरचा हलवा या पलिकडे गाजर फारसे वापरले जात नाही. मात्र त्यापलीकडे जाऊन गाजराचे विविध पदार्थ तयार करता येतात. असाच एक नवा पदार्थ आज आपल्यासाठी देत आहे.

सामुग्री: एकाच आकाराच्या मध्यम-जाडसर अशा तीन-चार गाजरांचे वाफवून उभे काप करावे. दोन अंडयांचे पांढरे फेटून बलक, अर्धा कप गव्हाच्या ब्रेडचा चुरा, अर्धा कप साय काढलेल्या दुधाचे ताजे दही, मीठ, मिरपूड चवीनुसार.

कृत ी: सर्वप्रथम गाजरे वाफवून घ्यावी आणि अंडयाच्या फेटलेल्या मिश्रणात बुडवावी. त्यात थोडे मीठ घालावे. नंतर गाजरे ब्रेडच्या चुर्‍यात घोळवावीत. नॉनस्टिक पॅन मंद आचेवर ठेवून त्यात दीड चमचा तेल घालावे. तयार गाजराचे काप अलगद भाजावे. खमंग परतावे. घाई करू नये.

दही, मीठ, मिरपूड, जिरेपूड एकत्र करावी. खमंग गाजराचे काप ताटलीमध्ये मांडून त्यावर दह्याचे मिश्रण घालावे. हिरवेगार कोथिंबीर सजवून खायला द्यावे.

यामुळे उष्मांक कमी करता येतात. हा पदार्थ चविष्ट व पौष्टिक आहे. उत्तम दर्जाची प्रथिने व फायबरयुक्त अन्न मिळते. अगदी झटपट होणारा हा प्रकार लहान मुलांना खूप आवडतो. विशेषत: फिटनेसकडे लक्ष देणारी लोक मोठय़ा हॉटेलातून देखील ऑर्डर करतांना दिसतात. एखाद्या मस्त संध्याकाळी हा पदार्थ करण्यास हरकत नाही.
( महान्यू ज)

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

केस धुण्यापूर्वी काय करावे? शॅम्पू करण्यापूर्वी केसांची या प्रकारे घ्यावी काळजी; सोपे उपाय

हिवाळ्यात सकाळी फिरायला जाताना या ५ गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा!

थंडीत पोळी अनेक तास गरम राहील; साठवण्यापूर्वी या सोप्या टिप्स लक्षात ठेवा

काही मिनिटांतच भीती नाहीशी होईल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही योगासने दररोज करा

लग्नात हातावर हवी गडद मेहंदीची रंगत? तर मेहंदी लावण्यापूर्वी जाणून घ्या या खास टिप्स!

Show comments