Festival Posters

वडा पाव

Updated: मंगळवार, 26 मे 2015 (15:55 IST)
पूर्वतयारी :   बटाटे उकडून घ्यावे. साल काढून कुस्करावे.
बेसन बारीक चाळणीतून गाळून घ्यावे.
आले बारीक करून पेस्ट करावी.
कांदे बारीक कापून घ्यावे.
लसूण साल काढून जिर्‍यासोबत वाटून घ्यावा.
मिरच्या वाटून घ्याव्यात. पुदिन्याची व शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यावी.

कृती :  गॅसवर कढई ठेवून तेल घालावे. तेलात कांदा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यावा. लसूण-जीरा व आल्याची पेस्टही तेलात भाजा. हिरवी मिरची पेस्ट तेलात तळावी.

कुस्करलेले बटाटे व तेलात भाजलेला मसाला एकत्र मिसळावा. मिश्रणाचे तळहाताने छोटे गोल-गोल गोळे करावे. एका पातेल्यात बेसन घ्यावे. बेसनात पाणी घालून पातळ द्रावण तयार करावे.

गॅसवर कढईत तेल घालून पाच-सात मिनिटांपर्यत गरम होऊ द्यावे. तेल तळणासाठी तयार झाल्यावर मिश्रणाचे गोळे बेसनाच्या द्रावणात घोळावे. गोळ्यावर बेसनाचा पदर तयार व्हायला हवा.

बेसनात तळलेला गोळा गरम तेलात तळायला टाकावा. मिश्रणापासून बनविलेले वडे कढईत झार्‍याच्या सहाय्याने परतावे. वड्यांना थोडा तांबूस रंग प्राप्त झाल्यानंतर वडे तळले गेले म्हणून समजायचे.

तळलेले वडे झार्‍याने काढावे. गरम खुमासदार वडे तयार. पाव चिरून तव्यावर बटर टाकून भाजून घ्यावे. पावात पुदिना चटणी व शेंगदाणा चटणी घालून मध्ये वडा घालावा. असा वडापाव खाण्यातील मजा काही औरच.
About Author
मनोज पोलादे
उपसंपादक.... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

प्रेरणादायी कथा : गुरु आणि शिष्य; कठोर परिश्रम केल्यानेच यश मिळते

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी तसेच स्टॅमिना सुधारण्यासाठी वेलची: एक नैसर्गिक वरदान

नद्या प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे पण या देशांमध्ये एकही नदी नाही, तरीही लोक आरामात राहतात!

मेहनत न करता लिंबाचा सगळा रस सहजपणे निघेल; फक्त लिंबू कापण्यापूर्वी ही सोपी युक्ती वापरा

Show comments