| अलीकडचा गुन्हेगारीचा अभ्यास जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त महिला गुन्हेगारीचे प्रमाण आहे. 9टक्के हा आकडाच अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण राज्यात सद्यस्थितीत 23 हजार 1 75 कैदी (महिला) आहेत. माझ्या मते हा आकडा अधिक जास्त असण्यची शक्यता आहे. तोंडात बोट घालायला लावणारा हा आकडा आहे आणि त्या आठवड्यातला 13 खुनाचा प्रयत्न हा आकडा तर आमच्या थोबाडात मारून घेण्याचा प्रकार आहे. दुसर्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यापेक्षा, अन्यायग्रस्त व्यक्तीला त्याचे अधिकार मिळवून देण्यात काय आनंद मिळतो, हे एकदा जोखून बघायला काय हरकत आहे? सामाजिक संघटनांनी कार्यक्रमांची रेलचेल करण्यापेक्षा त्या महिलांच्या आयुष्यात काही पोकळी निर्माण झाली असेल, काही महिलांना मार्ग सूचत नसेल, काहींना मागदर्शनाची गरज असेल, अशा व्यक्ती शोधून त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना सामाजिक कार्याची दिशा दाखविणे ही खरे तर जागतिक महिला दिनाची प्रेरणा ठरेल. स्त्रियांच्या हातून खुनासारख्या क्रूर घयना का घडतात? ही विचार करण्यासारखी बाब आहे. ज्या खुनाला अप्रत्यक्षरित्या महिला जबाबदार असतात, अशाही घटनांचा यात मी समावेश केला अहे. कुणाला तरी सांगून गुन्हा करवून घेणे हीसुद्धा तेवढीच गंभीर बाब आहे. प्रत्यक्ष खून करणार्या एका महिलेबद्दल मात्र मी एक सांगू शकेल की आपल्या कच्च्याबच्च्यांच्या पोटात दोन घास घालण्यासाठी ती स्वत:चा पानठेला चालवायची. नवर्याकडून तिचा होणार छळ आणि दारूसाठी तिच्या कष्टाच्या कमाईवर होणारे सततचे अतिक्रमण यामुळे वैतागुन तिच्या हातून ती घटना घडली आणि स्वत:च तिने ती मान्यही केली. त्यामुळे माझ्या मते ती माफीची हकदार निश्चितच आहे. पण आपल्या मार्गातला अडसर दूर करण्यासाठी निष्ठूर घटना दुसरी कोणतीच असू शकत नाही. अशा महिलांनाही संघटनेत समाविष्ट करून त्यांना कोणतेतरी विधायक काम सोपविण्यात सामाजिक संस्थांनी पुढाकर घेण्यास हरकत नाही. आजार्यांची सुश्रृषा करणे, कॅन्सरग्रस्त रोगी, निराधार महिला आश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा अनेक गरजू ठिकाणांसाठी आपण आपल्या आयुष्यातला थोडासा जरी वेळ दिला, तरी बरेचसे प्रश्न समाजातले आपोआप कमी होतील आणि खर्या अर्थी जागतिक महिला दिन साजरा करण्यासारखे होईल. |