| या समजुतीला संशोधनाचेपाठबळ मात्र मिळत नाही. आजच्या माध्यमिक शाळांतिल मुलींना शिक्षण देणार्या शिक्षकांची ही अभिमते भावी काळाच्या दृष्टीने सुयोग्य आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, ' जसा राजा तशी प्रजा' असे म्हणतात. शिक्षकांमार्फत होणार्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचे महत्त्व जाणणार्या विचारवंतांनी व सामाजिक कर्यकर्त्यांनी मुलींच्या शिक्षणाशी संबंधित असणार्या शिक्षकांच्या विविध विचारधारणांना अधिक शास्त्रशुद्ध पाया मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा. ' स्त्री म्हणजे फेअर सेक्स, नाजूक उन्हाने कोमेजणारी, गजगामिनी अशा रूढ कल्पनांचा पगडा अजूनही आमच्या शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात दिसतो. शक्ती लागणारी, शारीरिक श्रम ज्यात आहेत अशी पुरुषीपणा निर्माण करणारी कामे स्त्रियांनी अजिबात करू नयेत असे, आमचे पुरुष आजही म्हणतात. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी, माता ही आहेच पण या व्यतिरिक्त तिला काय व्हावेसे वाटते याला फारसे महत्त्व दिलेच जात नाही.
|