suvichar
✕

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवादी कट, कल्याण स्थानकाबाहेर 54 डिटोनेटर्स सापडले

Updated: गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024 (12:09 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात एक नंबर प्लॅटफॉर्मवर एस्केलेटरच्या शेजारी एका बॉक्समध्ये 54 डिटोनेटर सापडल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांना फोन आला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर दोन बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये डिटोनेटर होते. याबाबत तत्काळ बॉम्बशोधक पथकाला माहिती देण्यात आली.  
 
बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर हे डिटोनेतर ताब्यात घेतले आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. वर्दळीच्या वेळी ही घटना समोर आल्याने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या रेल्वे पोलीस ,बॉम्बशोधक पथक, कल्याण डीसीपी हे या घटनेचा तपास करत आहेत.
 
पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर स्फोटके कोणी आणले, कधी आणले, रेल्वे स्थानकावर का ठेवले याचा तपास आता पोलीस करत आहेत.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

अदानी समूह महाराष्ट्रात ६ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करणार

LIVE: अदानी समूह महाराष्ट्रात ६ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक करणार

कुस्तीमध्ये तीन पदके मिळाली, अमनने सुवर्णपदक जिंकले

फ्लायदुबईच्या सह-वैमानिकाने कॅप्टनवर कुऱ्हाडीने हल्ला केला, दहशतवादी हल्ला असल्याचे संयुक्त अरब अमिरातीने कबूल केले

भारताने मलेशियाला ५-१ ने हरवून आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

पुढील लेख
Show comments