Marathi Biodata Maker
✕

कारचा झाडाला धडकून झालेल्या अपघातात दोघांचा बळी

Updated: शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (07:40 IST)
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावर कांजूरगाव बस थांब्याजवळ ही घटना घडली. पूर्व द्रुतगती महामार्गावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या इनोव्हा कारचा (क्रमांक एम. एच. ०२ ए. एल. ५१८५)  २६ वर्षीय कारचालक जुनेद सलीम कुरेशी याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी मार्गावरील एका पिंपळाच्या झाडाला धडकली. या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. घटनेची वर्दी लागताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील नऊ जखमींना बाहेर काढले. यातील गंभीर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, अन्य जखमींना मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी चालक जुनेद कुरेशी आणि सहप्रवासी साहिल कुरेशी यांना डाॅक्टरांनी उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. अपघातातील गंभीर जखमी अयात आयान हाजीम कुरेशी (१८) याच्यावर फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. अन्य सहा जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

भारतीय महिला क्रिकेट संघ आता मैदानात उतरणार, पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे पाहायला मिळेल, हे जाणून घ्या

Caller Name Display Service : कॉलर नेम डिस्प्ले सिस्टीम म्हणजे काय, मोबाईल वापरकर्त्यांना त्याचे काय फायदे होतील

आझाद मैदानावर सीजेपीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची मंजुरी

ओरेगॉनमधील प्राथमिक शाळेत गोळीबार, चार जण ठार

LIVE: एसटी कार्यकर्त्यांनी दिवाळीपूर्वी संपाचा अल्टिमेटम दिला

पुढील लेख
Show comments