Marathi Biodata Maker
✕

दारू पिण्यावरून राडा; मालवणी परिसरात तरुणाची जमावाकडून हत्या

Updated: मंगळवार, 14 नोव्हेंबर 2023 (07:51 IST)
 
आरोपी आणि मृत तरुण हे दोघेही शेजारी राहणारे आहेत. आरोपी गोंिवद चव्हाण आणि उज्जा चव्हाण हे शेजारी राहतात. या दोघांमध्ये दारू पिण्यावरून किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असल्याची माहिती आहे. या हाणामारीत उज्जा चव्हाण हा गंभीर जखमी झाला. जमावाकडून होत असलेल्या बेदम मारहाणीत उज्जाचा जागेवरच मृत्यू झाला. मारहाण करणा-या जमावामध्ये महिलांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, मारहाणीची घटना सुरू असताना अनेक बघ्यांची गर्दी होती. मात्र, कोणीही मारहाणीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
 
या मारहाणीची माहिती पोलिसांना कळवण्यात आली होती. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मालवणी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचा-यांवर देखील जमावाकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी जमावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी गोंिवद चव्हाण या आरोपीस अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान, मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, मंत्र्यांनाही दिल्या सूचना

मंदिराच्या यात्रेला निघालेल्या एका कुटुंबाचा अपघात, तिघांचा मृत्यू

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर सुनील तटकरेंचे विधान; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सासू आणि दीर यांच्यासह तिघांचा जामीन मंजूर

अल्ट्राव्हायोलेटने अप्रतिम इलेक्ट्रिक मोटरसायकल, एक्स-47 व्हेनम,बाईक लॉन्च केली

पुढील लेख
Show comments