मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी विशाल ट्रॅव्हल्स गाडी नंबर एम एच 46 जे 5252 ही गाडी महामार्गावरील सावर्डे आगवे वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटली. या गाडीत एकूण 47 प्रवासी होते. यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचा आकडा अद्याप समजू शकला नाही. उपचारासाठी जखमींना जवळील डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.