सोमवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर पोलिस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत एक भारतीय जवानही शहीद झाला आहे. याआधी 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता.