Dharma Sangrah
✕

केदारनाथ मध्ये भाविकांनी रचला इतिहास, प्रथमच दार उघडल्यावर इतके भाविक आले

Updated: शुक्रवार, 10 मे 2024 (20:54 IST)
 
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणाले, या यात्रेमुळे पहिल्या दिवशी भाविकांमध्ये उत्साह दिसून आला असून येत्या काळात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी सकाळी ७ वाजता वेद मंत्रोच्चारात उघडण्यात आले.या वेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी बाबा केदारनाथचे दर्शन केले. 
 
 बाबांच्या दर्शनासाठी रात्री एक वाजल्यापासूनच भाविकांच्या रांगा लागल्या. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंदिराचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. यानंतर सकाळी ठीक7 वाजता धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी संपूर्ण केदारनाथ परिसर बाबांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. सकाळी दहापर्यंत संपूर्ण मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता.बाबा केदार यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.  

Edited By- Priya Dixit  
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments