suvichar

भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावले

भारत आणि अमेरिकेने  पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादाला थारा देऊ नका अशा शब्दात ठणकावले आहे. पठाणकोट आणि २६/११ च्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या आश्रयस्थान नष्ट करण्याचा निर्धारही या दोन्ही नेत्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुचर्चित भेट सोमवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) पार पडली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे जगभराचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या  बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

दहशतावाद नष्ट करणे यावर आमचा भर असेल असे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही दहशतवाद, कट्टरतावाद यावर चर्चा केली असून याविरोधात एकमेकांना सहकार्य करण्यावर एकमत झाल्याचे मोदींनी सांगितले.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments