Daily Horoscope
✕

JNU सिक्युरिटी गार्डचा व्हिडीओ व्हायरल

Updated: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (17:43 IST)
अनेकांना नृत्याची खूप आवड असते. त्यांना जिथे संधी मिळेल तिथे ते सुरू करतात. काही लोक डान्स कॉपी करतात, तर काही जण त्यांच्याच स्टाइलमध्ये डान्स करून लोकांची मने जिंकतात. हा व्हायरल व्हिडिओ जेएनयूमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की काही कार्यक्रम चालू आहे. विद्यार्थी मस्तीच्या मूडमध्ये आहेत. अशा स्थितीत सुरक्षा रक्षकाला नाचण्यास सांगितले. संधी मिळताच सुरक्षा रक्षक नाचू लागला. बॅकग्राऊंडमध्ये 'जुली ज्युली' हे बॉलीवूड गाणे वाजत आहे. गाण्यावर गार्ड मोठ्या उत्साहात नाचतोय. त्याचवेळी मध्यभागी असलेला एक विद्यार्थीही गार्डसोबत नाचू लागतो.

गार्डची स्टाइल आणि डान्स स्टेप्स पाहून लोकही हैराण झाले आहेत आणि त्याचे कौतुकही करत आहेत. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर @Jnuroundtable या नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 27 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 13शेहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments