मेधा पाटकर यांच्या उपोषणस्थळी पोलिस पोहोचले आणि त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांशी पोलिसांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी मेधा पाटकर यांच्यासोबत एकूण 12 कार्यकर्त्यांना अटक केली आणि रुग्णवाहिकेतून घेऊन गेले. अहिंसेच्या मार्गाने आवाज उठवणाऱ्या मेधा पाटकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याने सर्वच स्तरातून मध्य प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.