Biodata Maker marathi
✕

5 रुपये खर्चल्यामुळे आईने चिमुकल्याला दिले चटके

Updated: रविवार, 9 ऑगस्ट 2026 (16:32 IST)
या कलियुगातील आईने मुलाच्या तळपायांना गरम सुरीने चटके दिले, त्याला एका खोलीत कोंडून ठेवले आणि स्वतः वाढदिवसाच्या पार्टीला निघून गेली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, राधानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलवामऊ गावचा रहिवासी असलेला व्यक्ती , इंदूरमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याची पत्नी आणि मुलगा गावात राहतात. पत्नीने मुलाला २० रुपये दिले आणि गुटका मागवला. मुलाने १५ रुपयाचा गुटका विकत घेतला आणि ५ रुपयांची चॉकलेट घेऊन खालली. घरी आल्यावर आईने ३ गुटके पाहून संतापली. 
ALSO READ: जनरेशन झेड' ही एक अशी शक्ती आहे, ज्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले
त्या बाईने आधी मुलाला बेदम मारहाण केली आणि नंतर गॅसवर चाकू तापवून त्याचे दोन्ही तळवे वाईट रीतीने भाजले. यानंतर, तिने मुलाला एका खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले आणि स्वतः शेजारी वाढदिवसाच्या पार्टीला निघून गेली. 
 
थोड्या वेळाने शेजारचा मुलगा त्याला शोधत घरी आला आणि त्याने पीडित मुलाला रडताना पहिले आणि पीडित मुलाने घडलले सर सांगितले. माहिती मिळतातच शेजारचे सगळे धावत आले आणि कुलूप उघडायला सांगितले. घरात आल्यावर त्यांनी बघितले की, मुलाचे पाय भाजले होते.
ALSO READ: ई-२० पेट्रोलवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले की, लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले, भाजपने राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले
ही घटना कळताच, वडील इंदूरहून मुलाच्या घरी धावत आले. पत्नीचे कृत्य ऐकून आणि मुलाची अवस्था पाहून, त्यांनी तिच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली. सध्या, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. 
 
मुलाच्या वडिलांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांच्या आईलाही मारहाण केली होती. 
 पतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments