Festival Posters

युवराज विचार मांडायला शिकत आहेत- मोदी

गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (14:52 IST)
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी मोदींवर मोठे आरोप केले होते. यावर मोदी यांनी सुद्धा आपले मत मांडले असून,त्यांनी चौफेर टीका केली आहे. वाराणसी हिंदू विद्यापीठातील कार्यक्रमात मोदी यांनी निश्चलनीकरणाच्या निर्णयावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देत उपरोधक टीका केली आहे.काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे मोदींच्या व्यक्तिगत भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचा आरोप केला होता. हे पुरावे उघड झाल्यास देशात भूकंप होईल, असा दावाही राहुल यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांची उपरोधिकपणे खिल्ली उडविली. काँग्रेसचे युवा नेते आता कुठे भाषण करायला शिकत आहेत, त्यांना आता कुठे काही गोष्टी कळायला लागल्या आहेत. तर त्यांनी आता नीट भाषण शिकून आपले विचार मांडावेत असेही मोदी यांनी मत व्यक्त केले आहे. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

पुढील लेख
Show comments