Marathi Biodata Maker

संयुक्त जनता दल अखेर एनडीएमध्ये सहभागी

शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (17:45 IST)

संयुक्त जनता दलाने अखेर भाजपप्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष का र्यकारिणीच्या बैठकीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. जदयूच्या प्रवेशामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

जुलै महिन्यात नितीशकुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवला होता. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या ‘महाआघाडी’तून बाहेर पडण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामादेखील दिला. यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपशी युती केल्यानंतर नितीशकुमार एनडीएत प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments