Marathi Biodata Maker
✕

पंतप्रधान मोदींचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी राजीनामा दिला, पीएमओ सोडणारे वर्षातील दुसरे वरिष्ठ अधिकारी

Updated: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (16:41 IST)
 
सिन्हा हे 1983 च्या बॅचचे बिहार कॅडरचे IAS अधिकारी आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांची मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.राजीनामा देण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पीएमओमधून या वर्षीचा हा दुसरा महत्त्वपूर्ण राजीनामा आहे. या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के सिन्हा यांनी राजीनामा दिला होता.
 
ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर सिन्हा यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली.तीन दशकांच्या कारकीर्दीत सिन्हा यांनी शिक्षण मंत्रालय आणि पंचायती राजमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. ते ग्रामीण विकास बाबींमध्ये तज्ज्ञ आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि सर्व शिक्षा अभियान यांसारख्या योजनांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. सिन्हा यांनी लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्येही काम केले आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

पुढील लेख
Show comments