Marathi Biodata Maker
✕

President Election 2022- द्रौपदी मुर्मू विजयी, देशातील प्रथम आदिवासी राष्ट्रपती

Updated: गुरूवार, 21 जुलै 2022 (20:30 IST)
  
 मुर्मू यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली
मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. NDAच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मतमोजणीच्या तिसर्‍या फेरीअखेर एकूण वैध मतांचा 50 टक्के आकडा ओलांडला आहे, जो देशाच्या पुढील राष्ट्रपती होण्यासाठी पुरेसा आहे. मुर्मू यांच्या बाजूने 577777 मते पडली. तर यशवंत सिन्हा यांच्या बाजूने 261062 मते मिळाली.
 
मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली
मतमोजणीची तिसरी फेरी संपली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. मात्र, अद्याप औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. मतमोजणीची पुढील फेरी बाकी आहे. मात्र सिन्हा यांना मुर्मू यांच्या पुढे ठेवणारी इतकी मते त्यांच्याकडे नाहीत. 
 
मुर्मूच्या वडिलोपार्जित घरी उत्सव 
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे मूळ ठिकाण असलेल्या ओडिशातील रायरंगपूर गावात उत्सव सुरू आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित आहे. त्या सध्या त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांच्यावर 1,349 मतांनी आघाडीवर आहेत.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments