ganesh chaturthi

गुजरातमध्ये भाजपच्या विजयाची 5 मोठी कारणे

Updated: सोमवार, 18 डिसेंबर 2017 (12:17 IST)
 
ब्रँड मोदी: मोदींची जादू अजूनही कायम आहे. ज्याप्रकारे मोदींनी प्रचार केला आणि गुजरातच्या जनतेला पुन्हा एकदा भावनिक रूपात जोडले ते भाजपच्या पक्षात राहिले. मोदींनी प्रचार दरम्यान पाकिस्तानाचा मुद्दाही मांडला. त्यांनी म्हटले की काँग्रेसचे लोकं गुजरातच्या मुलावर प्रश्न उचलत आहे.
 
मणिशंकर अय्यर: काँग्रेसने भाजपचे पाटीदार वोट्स कापले असले तरी ‍मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी नीच या शब्दाचा वापर काँग्रेससाठी महागात पडला. आकड्यावर नजर टाकल्यास पहिल्या चरणात काँग्रेसला फायदा मिळाला परंतू मोदींसाठी अपशब्द बोलल्यामुळे भाजपची बाजू भारी झाली. दुसर्‍या चरणात भाजपने काँग्रेसच्या अनेक सीट्सवर ताबा घेतला.
 
अमित शाह यांची रणनीती: या निवडणुकीत मोदींची प्रतिष्ठेसह भाजप अध्यक्ष ‍अमित शाह यांची प्रतिष्ठेचादेखील प्रश्न होता यात काहीच शंका नाही. शाह यांनी निवडणुका जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व नीती वापरल्यात. एवढेच नव्हे तर 70 हून अधिक सीट्सवरुन निर्दलीय उमेदवार उभे केले ज्याने काँग्रेसचे वोट कापले गेले. सत्ता विरुद्ध लहर असूनही गुजरातमध्ये भाजपची सरकार अर्थातच शाह यांची नीती प्रभावी ठरली.
 
कार्यकर्त्यांचे सैन्य: स्वत:ला विश्वाचे सर्वात मोठे पक्ष असण्याचा दावा करणारी भाजपकडे कार्यकर्त्यांचे मोठे सैन्य आहे. निश्चितच गुजरातला याचा फायदा मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवकांनी घराघरात जाऊन भाजपच्या पक्षात प्रचार केला.
 
तुफानी प्रचार: तसे तर भाजप आणि मोदी यांनी पूर्ण निवडणुकीदरम्यान तुफानी प्रचार केला परंतू दुसर्‍या चरणात मोदी यांनी आपला पूर्ण वेळ गुजरातला दिला. त्यांनी 40 सभा घेतल्या. आपला पूर्ण वेळ देण्याचे कारण की त्यांची आणि गुजरात मॉडलची प्रतिष्ठेचा प्रश्न. कारण याच मॉडेलला समोर मांडून त्यांनी दिल्लीत सत्ता काबीज केली होती. हा मॉडल फेल ठरला असता तर संपूर्ण देशात चुकीचा संदेश गेला असता आणि 2019 मधील लोकसभा निवडणुका तसेच 2018 मधील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगढ आणि कर्नाटक राज्यातील निवडणुका आता जवळपास समोरच आल्या आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments