Festival Posters

महिला अत्याचारांवर आरएसएस ने जलद न्याय देण्याची मागणी केली

Updated: बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (13:04 IST)

कायदेशीर चौकट मजबूत करणे, समाजात जागरूकता वाढवणे, तसेच डिजिटल सामग्रींशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे आवश्यक होते. ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या सामग्रींचे परीक्षण करणे आवश्यक आहे.

कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी देशभरात व्यापक मोहीम राबवण्याची गरज असल्याचे संघाने म्हटले. संघाने कोलकाता घटनेचा निषेध केला आणि त्याला अत्यंत दुर्देवी घटना असल्याचे म्हटले. 

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष भाजपने कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा दावा करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारला गोत्यात उभे केले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णयावर संघ सहमत नसल्याचे म्हणाले. 

संघाच्या समन्वय बैठकीत भागवत, नड्डा यांच्यासह ३०० हून अधिक लोकांनी विचारमंथन केले, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार, भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष आणि इतर ३२ जण सहभागी झाले होते. संघाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसह सुमारे 300 कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited by - Priya Dixit  
  

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments