suvichar
✕

गायक सिद्धू मूसेवालाचे आई-वडील लवकरच पुन्हा पालक होणार

Updated: मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (12:53 IST)
 
एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, दिवंगत गायक सिद्धू मूसेवालाची आई पुढील महिन्यात आपल्या मुलाला जन्म देणार आहे. सिद्धू मूसवाला त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. 29 मे 2022 रोजी बिष्णोई टोळीने गायकावर हल्ला केला आणि त्याचा जीव घेतला, त्यावेळी गायक फक्त 28 वर्षांचा होता. मात्र, त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली. तरुण वयात त्यांनी नावच नाही तर प्रसिद्धीही मिळवली होती. मूसेवाला यांच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली होती. सर्वत्र दु:खाचे सावट  होते. देशाच्या कानाकोपऱ्यात दुःखाचे वातावरण दिसत होते. परदेशातील गायकाचे चाहतेही त्याला न्याय देण्याची मागणी करत होते.

सिद्धू मूसवाला यांची 2022 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने त्यांचे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. त्यामुळे गायकाचे चाहते सिद्धू कुटुंबाच्या वारसासाठी सतत प्रार्थना करत होते. याच कारणामुळे सिद्धूने आता आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला आहे. आता वृत्तांवर विश्वास ठेवला तर, दिवंगत अभिनेत्याची आई मार्च महिन्यात मुलाला जन्म देणार आहे

Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments