शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (16:36 IST)

2 बायका, 9 मुलं आणि 6 गर्लफ्रेंड यांच्या उदरनिर्वाहासाठी गुन्हेगार बनला

नेपाळमधून आणलेल्या बनावट नोटा देऊन तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अजित मौर्य असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला बुधवारी लखनौच्या सरोजिनीनगर येथून अटक केली. पोलिसांनी चौकशीदरम्यान आरोपीला विचारले असता, तू हा गुन्हा का केलास? अजितने जेव्हा हे उत्तर दिले तेव्हा ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित म्हणाला की सर, मी गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला कारण मला 2 बायका, 6 मैत्रिणी आणि 9 मुलांना आधार द्यावं लागतो.
 
पूर्वी तो खऱ्या नोटा बनावट नोटा म्हणून देत असे
चौकशीदरम्यान अजितने सांगितले की, आम्ही कोणताही रँडम नंबर डायल करतो. त्यानंतर अर्धा तास लोकांशी बोलून आम्ही त्यांना आमच्या योजनेबद्दल सांगून फसवणूक करायचो. समोरची व्यक्ती आमच्या फंदात पडली की आधी आम्ही त्याला खरी नोट खोटी नोट म्हणून देऊन टाकायचो. ती व्यक्ती खोट्या नोटा समजून बाजारात खऱ्या नोटा पास करते आणि पकडले जात नाही. यानंतर फसवणुकीत अडकलेले लोक समोरून अजितच्या टोळीला बोलावून मोठ्या रकमेची मागणी करतात. यानंतर टोळीचे सदस्य काही खऱ्या पैशांसह सर्व बनावट पैसे एका पिशवीत टाकून पळून जातात.
 
अर्ध्या तासात पैसे दुप्पट करण्याची योजना होती
त्याला बुधवारी गोंडा जलालपूर बुधनी मार्केटमधून अटक करण्यात आली. उन्नाव येथील रहिवासी असलेल्या धर्मेंद कुमार यांनी अजितविरोधात गुन्हा दाखल केला होता. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, धर्मेंद्र यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. फोनवर त्याला अर्ध्या तासात पैसे दुप्पट करण्याची योजना सांगण्यात आली. गुन्हेगारांचे म्हणणे ऐकून धर्मेंद यांनी दिलेल्या पत्त्यावर ट्रान्सपोर्ट नगर गाठले. जिथे त्याने कारमधील तीन लाख रुपयांनी भरलेली बॅग गुन्हेगारांच्या ताब्यात दिली. त्या बदल्यात गुन्हेगारांनी त्याला 6 लाख रुपये दिले आणि कार घेऊन पळ काढला. धर्मेंद्रने बॅग उघडली तेव्हा ते थक्क झाले. बॅगेत बनावट नोटा पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने सरोजिनी नगर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दिली.
 
टोळीतील आणखी 2 जणांचा शोध सुरू
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस कारवाईत आले. पोलिसांनी तातडीने ट्रान्सपोर्टनगर गाठले. जिथे एका शोरूमचे सीसी फुटेज तपासण्यात आले. येथून पोलिसांना वाहनाचा क्रमांक मिळाला. यानंतर धर्मेंदचा नंबर घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. अजितसोबत त्याच्या टोळीत आणखी दोन जण आहेत. ज्यांचा पोलीस शोध घेत आहेत.