सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (16:16 IST)

Lucknow : विद्यार्थ्याला धडक देऊन कारने फरफटत नेले,विद्यार्थांचा मृत्यू

लखनौच्या शहीद पथावर भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे बाईकवर चाललेला एमबीएचा विद्यार्थी कारमध्ये अडकला आणि 50 मीटरपर्यंत फरफटत गेला. या अपघातात  गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

पुरुषार्थ त्रिपाठी(24) असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव असून तो एमबीएचे शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी तो कॉलेजमधून घरी परतत होता. पुरुषार्थ नुकताच शहीद पथावरील प्लासिओ मॉलजवळ पोहोचला असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

धडकेनंतर कार चालकाने कारचा  वेग वाढवला. विद्यार्थी दुचाकीसह कारमध्ये अडकला आणि फरफटत नेला गेला. दुचाकीस्वार अडकल्याचे पाहून रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आवाज काढण्यास सुरुवात केली. चालकाने गाडी थांबवली. जखमीला कारमधून बाजूला ओढून तिथेच टाकून कारसह पळून गेला. पुरुषार्थला गंभीर अवस्थेत रुग्णालयात पाठवले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.पुरुषार्थच्या मृत्यूने आईसह संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कार चालकाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit