मेरठ-लखनऊ राज्यराणी एक्स्प्रेसचे डबे रूळांवरून खाली घसरल्याने अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशमधील रामपर येथे शनिवारी सकाळी 8.20च्या सुमारास रामपुरच्या कोसी पुलावर ही घटना घडली. यात 15 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी घेतली असून बचावकार्याला सुरूवात केली. एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले...