Marathi Biodata Maker
✕

गोव्यात पॅराग्लायडिंग दरम्यान अपघात, दोघांचा मृत्यु, गुन्हा दाखल

Updated: रविवार, 19 जानेवारी 2025 (12:45 IST)

हा अपघात शनिवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास केरी गावात केरी पठारावर घडला. या अपघातात पुण्यातील रहिवासी पर्यटक शिवानी दाबाळे आणि तिचे प्रशिक्षक सुमल नेपाली यांचा मृत्यु झाला. महिला ट्रेनर नेपाली होती. कंपनीच्या पायलटला परवान्याशिवाय पॅराग्लायडिंग करण्यास परवानगी दिली, ज्यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला.
 
दाबाळे यांनी ज्या ‘ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कंपनी’कडे ‘पॅराग्लायडिंग’साठी बुकिंग केले होते.ती बेकायदेशीरपणे चालवली जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, फिर्यादीनुसार, 'पॅराग्लायडर' उड्डाण घेतल्यानंतर लगेचच दरीत कोसळले आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंपनीचे मालकाच्या विरुद्ध मांद्रेम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकाच्या विरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments