suvichar
✕

असा आहे कोरेगाव पार्क परिसर

Published: रविवार, 14 फेब्रुवारी 2010 (00:11 IST)
ओशो आश्रमामुळे कोरेगाव पार्क परिसर जगभर परिचित झाला आहे. उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेला हा परिसर आहे. या परिसरातील जागेला सोन्यापेक्षाही जास्त मूल्य आहे. विदेशी नागरिकही आणि सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्‍यांचेही निवासस्थान या परि‍सरात आहे. त्यामुळे या परिसरात बॉंबस्फोट झाल्याने सारेच हादरले आहे. स्फोट झालेल्या परिसरापासून बंड गार्डन पोलिस स्टेशनही जवळ आहे.

ओशो आश्रम, हॉटेल ताज ब्ल्यू डायमंड, जर्मन बेकरी यासह ज्यू लोकांचे महत्त्वाचे ठिकाण असलेले छाबड हाऊसही या बेकरीपासून जवळ आहे. ओशो आश्रमात देश-परदेशातील लोक साधनेसाठी येत असतात. ओशो येथे राहिले होते. त्यांची प्रवचने येथे व्हायची. त्या आधीपासूनच नोकरदार मंडळी मंडळी निवृतीनंतरचे आयुष्य व्यतीत करण्यासाठी या भागाला प्राधान्य देत. त्यानंतर हा परिसर उच्चभ्रू लोकांचे वस्तीस्थान बनला आहे.

काय आहे जर्मन बेकरी?
जर्मन बेकरी हे पुण्यातील प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. पुण्याच्या कोरेगाव परिसरात गेल्या दोन दशकांपासून जर्मन बेकरी प्रसिद्ध आहे. परदेशी पर्यटकांचा येथे कायम राबता असतो. ओशो आश्रम व ज्युईश सेंटर या दोन कारणांमुळेही येथे परदेशी पर्यटक कायम येत असतात. येथे बेकरी पदार्थ व कॉन्टेनेंटल फूड अतिशय वाजवी दरात मिळते. इथले पदार्थही चविष्ट असतात अशी त्याची ख्याती आहे.

जर्मन बेकरीजवळ असलेले छाबड हाऊस हे ज्यूंचे विश्रांतीस्थळ आहे. मुंबईत 26-11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेले नरीमन हाऊसही देखील ज्यू लोकांचे होते. अमेरिकेत पकडलेला डेव्हिड हेडली नरिमन हाऊसप्रमाणेच छाबड हाऊस परिसरातही येऊन गेला होता.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments