Festival Posters
✕

सुरेश प्रभूंची सेनेला सोडचिठ्ठी

Written By wd
Updated: सोमवार, 10 नोव्हेंबर 2014 (11:02 IST)
 
प्रभू हे शिवसेनेत फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळेच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यायचे असेल तर भाजपने त्यांच्या कोटय़ातून त्यांना मंत्रिपद द्यावे, असे शिवसेनेने स्पष्टपणे सांगितले होते. त्यावर भाजपकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र शिवसेनेने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर नाटय़मय घडामोडी घडल्या. शिवसेनेचा कोणीही खासदार या सोहळ्याला हजर राहिला नसला तरी सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसलेले प्रभू हजर होते आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यामुळे प्रभू नेमके कोणाचे?, असा प्रश्न निङ्र्काण झाला होता. या प्रश्नाचे उत्तर काही वेळातच मिळाले असून प्रभू यांनी मंत्री होण्याआधीच शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले होते, असे आता स्पष्ट झाले आहे.
 
प्रभू यांच्यावर मोदी फिदा
 
सीए असलेल्या सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचे बोट धरून राजकारणात प्रवेश केला. तळकोकणातील राजापूर मतदारसंघातून प्रभू यांना शिवसेनेने लोकसभेत पाठवले होते. त्यानंतर अभ्यासू व्यक्ती अशी आपली ओळख त्यांनी दिल्लीच्या राजकीय वतरुळात निङ्र्काण केली. त्याच्या जोरावरच प्रभू यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण आणि ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळाली होती. त्यामुळेच अशा अनुभवी चेहर्‍याला मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले असल्याचे बोलले जाते. प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालय या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

Show comments