Marathi Biodata Maker
✕

अ‍ॅपलच्या स्वस्त iPhone वर आकर्षक डिस्काउंटची ऑफर

Updated: बुधवार, 29 जुलै 2020 (22:24 IST)
 
काय आहे ऑफर? :-  iPhone SE 2020
 
फ्लिपकार्टवर iPhone SE ची (64GB) किंमत 40 हजार 999 रुपये आहे. मात्र, अ‍ॅपल डेज सेलमध्ये हा फोन 37 हजार399 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. म्हणजे या फोनवर 3 हजार 600 रुपये डिस्काउंट मिळत आहे. पण, या डिस्काउंटचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे फोन खरेदी करावा लागेल. एचडीएफसी क्रेडिट कार्डने ईएमआयवर फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल.
 
या ऑफरव्यतिरिक्त सेलमध्ये या फोनवर 14,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंटचीही ऑफर आहे. याशिवाय फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर पाच टक्के कॅशबॅक मिळेल. तर, सेलमध्ये एचडीएफसी डेबिट कार्डवरही 1500 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटची ऑफर आहे. सेलमध्ये आयफोन SE च्या तिन्ही व्हेरिअंटवर डिस्काउंटची ऑफर आहे. म्हणजे 64GB व्हेरिअंट, 128GB व्हेरिअंट आणि 256GB व्हेरिअंटच्या खरेदीवर या ऑफरचा फायदा घेता येईल.
 
फीचर्स :-
नव्या आयफोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. F/१.८ सह १२ मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असून याद्वारे 4के व्हिडीओ शूट करता येणार आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये ७ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायात नवीन आयफोन उपलब्ध असेल.
 
iPhone SE 2020 मध्ये ४.७ इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या मोबाइलमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे.
तसंच यामध्ये टच आयडी बटणही आहे. iPhone SE 2020 चा लुक iPhone 8 प्रमाणेच आहे. तसंच हा फोन IP67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. फोनची संपूर्ण बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अ‍ॅल्युमिनिअमपासून बनली आहे. तसंच फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही पर्याय देण्यात आला आहे. 
 
फास्ट चार्जिंगसह केवळ अर्ध्या तासात हा फोन ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख
Show comments