Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फोनची बॅटरी संपत असेल तर करा हे पाच उपाय

Updated: मंगळवार, 26 जुलै 2016 (12:31 IST)
 
1 फोनच्या स्क्रीनचा ब्राईटनेस ठेवा कमी 
 
कोणत्याही टच स्क्रीन स्मार्टफोनची बहुतेक बॅटरी स्क्रीनच्या ब्राईटनेसमुळेच जास्त संपते. बॅटरी जास्त वेळ टिकवायची असेल तर तुमच्या फोनच्या स्क्रीनचा ब्राईटनेस कमी करा. 
 
2 लाईव्ह वॉलपेपर वापरणं टाळा 
 
अनेक जण त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर लाईव्ह वॉलपेपर म्हणजेच अँनिमेटेड वॉलपेपर ठेवतात. अशा वॉलपेपरमुळे फोनची बॅटरी लवकर संपते, म्हणून लाईव्ह वॉलपेपर वापरण्याचा मोह शक्यतो टाळा. 
3 अँपचं ऑटो अपडेट ठेवा ऑफ
 
अँन्ड्रॉईड फोनमध्ये असलेल्या सगळ्याच अँपना काही दिवसांनी अपडेट करावं लागतं. तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये या अँपसाठीचं ऑटो अपडेट ऑन ठेवलं असेल तर तुमच्या फोनची बॅटरी आणि इंटरनेटचा डेटा चार्जही जातो. या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी ऑटो अपडेट ऑफ ठेवा. 
 
4 ब्लू टूथ आणि वायफाय ठेवा ऑफ
 
अनेक जण ब्लू टूथ आणि वायफाय ऑन केल्यानंतर ते ऑफ करणं विसरून जातात. यामुळेही फोनची बॅटरी लवकर संपते.
5 अँप्सचा डूपल Interval करा कमी
 
तुमच्या फोनमध्ये असलेली फेसबुक, ट्विटर, जीमेल, गुगल प्लस, ऑफिस मेलसारखी अँप्स बॅकग्राऊंडला सुरूच असतात, यामुळे मोठय़ा प्रमाणावर बॅटरीचा वापर होतो. हे अँप तुम्हाला बंद करणं अशक्य असेल तर या अँप्सच्या सेटिंगमध्ये जाऊन डूपल Interval कमी करा. यामुळे तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालण्यास नक्कीच मदत होईल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

LIVE: वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

सिद्धिविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस, ४६ कर्मचारी निलंबित , ९ जणांना अटक

कुर्ल्यातून अपहरण झालेला ६ महिन्यांचा मुलगा ४ तासांत सापडला, आरोपीला अटक

विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेस मध्ये येण्याचे ऑफर दिले

पुढील लेख
Show comments