बाळासाहेब ठाकरे बालबुद्धीचे- अबू आझमी
PR
विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुस-या दिवशी सभागृहात जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना अबू आझमी यांनी आज पुन्हा मनसे आणि शिवसेनेवर विखारी टीका केली. राज ठाकरे आणि मनसे आमदारांना शिव्यांची लाखोली वाहतानाच त्यांनी शिवसेनेलाही या वादात ओढत चक्क शिवसेना प्रमुखांवरच टीका केली.
मराठी भाषेतून शपथ घेण्याच्या मुद्यावरून सोमवारी विधानसभेत सुरू झालेल्या नाट्याचा दुसरा अंक सुरू होता होता अबू आझमीने या मुद्यात आतापर्यंत शांत बसलेल्या शिवसेनेलाही ओढून घेतले असून 'बाळासाहेब निवडणुकीत पराभूत झाल्यापासून ते सकाळ-संध्याकाळ मराठी माणसाला शिव्या घालत असतात. ते आता मुंबईत मरायलाही तयार नाहीत. जसं वय वाढत चाललयं तशी त्यांची बुध्दीही अधिक भ्रष्ट होत चालली आहे', अशी शिवसेना प्रमुखांवर केली आहे.
अबू यांच्या या कृत्याने आता मनसेनंतर शिवसेनाही या वादात उतरण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे राज्यात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
(या बातमीबद्दल खाली दिलेल्या रकान्यात आपले मत नोंदवा)

